सोनई येथे रंगला खेळ पैठणीचा…..

—विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
नवरात्री निमित्त सोनई येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व पसायदान ध्यानमंदिर व सुजाता इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनियर कॉलेज सोनई संचलित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभागी नोंदविला. दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा पार पडली.
प्रारंभी उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीताताई गडाख व उषाताई गडाख यांच्यासह पुष्पा सोनवणे,आशा सोनवणे, वात्सल्य प्रतिष्ठानचे विश्वस्त सुलोचना सोनवणे, पी. आय.माणिक चौधरी,संजु गर्जे, उदय पालवे,सुभाष राख,भागवत रामकृष्ण, किशोर घावटे, विठ्ठल खाडे महाराज तसेच संस्थापक श्री.किरण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली सुमारे 200 हुन अधिक महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उखाणे, तळ्यात, मळ्यात, चेंडू फेकणे, धागा वेचणे, दीप प्रज्वलित करणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला.
सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. पंधरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांचा पैठणी व इतर बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून सुनिताताई गडाख व उषाताई गडाख यांनी उपस्थित महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या ,या स्पर्धेत परीक्षक म्हणून आदरणीय उषा दीदी,शुभांगी बडे व मीनाताई भाळगट यांनी काम पार पाडले
.या स्पर्धेत अंजली संतोष गुरसळ यांनी प्रथम पुरस्कार (मानाची पैठणी) ,भारती संतोष शेटे द्वितीय पुरस्कार (सोन्याची नथ) व श्वेता सचिन कुरकुटे तृतीय पुरस्कार (चांदीचा करंडा) मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रामकृष्ण वामन भागवत (पत्रकार झी 24 तास) यांनी आपल्या खास शैलीत केले. दरम्यान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य सचिन चांडे तसेच शाळेतील शिक्षक किसन पुंड, उर्मिला साळुंके,बाळकुमार डमाळे,शरद सोनवणे, अर्चना दरंदले,गडाख स्वाती, बाराहते वंदना, प्रांजल दरंदले,कामक्षा दरंदले, संध्या गायकवाड,प्रीती देशमाने, उषा आदमने,सविता जाधव, कल्पना शेटे, ,पल्लवी तनपुरे ,तोडमल सुवर्णा, कैतके स्वाती, निमसे सोनाली श्री.रोहित लहाड,सुजाता दरंदले,सुरेखा कर्जुले, यांनी विशेष परिश्रम घेतले.