पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिला केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविल्या -केंद्रीय उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल .

अकोले प्रतिनिधी
पंतप्रधान मोदी यांचे 2030 पर्यंत देशातील साठ टक्के महिलांच्या हाताला काम देऊन त्यांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे उद्दीष्ट आहे .हे ध्येय साध्य करण्यासाठी महिलांना पुढे आणण्याची गरज असून त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सन्मान देणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले.
अकोले येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याचे वतीने के.बी. दादा देशमुख सभागृहात महिला मेळावात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जेष्ठ नेते तथा माजीमंत्री मधुकरराव पिचड होते. आमदार डॉ.राहुल आहेर, भाजप अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड, प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, सौ.हेमलताताई पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर,जि.प.गट नेते जालिंदर वाकचौरे, सुनील वाणी, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.सोनालिताई नाईकवाडी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, उपाध्यक्ष लता देशमुख, प्रेरणा पारगे, सचिव मंदा बराते, महिला तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे, सौ वैशाली जाधव, तालुका अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, अमृतसागर संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, राजेंद्र डावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,बांधकाम सभापती सौ.वैष्णवी धुमाळ, महिला व बाल कल्याण सभापती सौ प्रतिभा मनकर, नगरसेविका सौ.शीतल वैद्य, सौ.जनाबाई मोहिते, तमन्ना शेख, सौ.माधुरी शेणकर, सौ.कविता शेळके, आरोग्य सभापती शरद नवले,पाणी पुरवठा सभापती हितेश कुंभार, सागर चौधरी,विजय पवार आदींसह अनेक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर महिला,युवती उपस्थित होत्या.
यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केंद्रीय मंत्री पटेल यांचा वारकरी पगडी घालून सत्कार केला.
केंद्रीय मंत्री पटेल पुढे म्हणाले की, मातृशक्ती ही मोठी शक्ती असून त्यांनी ठरवले तर आपले कुटुंब, जिल्हा, राज्य व देश हे सक्षम बनवू शकते.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिला ह्या केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविल्या असून प्रत्येक घराला उपयोगी असणाऱ्या या योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात योजना राबविताना कोणत्याही प्रकारे जाती, धर्माच्या आधारावर पक्षपात केला नाही. ज्या योजनांचे लाभ मिळण्यासाठी 10-20 वर्षे लागत होती त्यात पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सुसूत्रता आणल्याने लाभार्थ्यांना न मागता लाभ मिळत आहे.आपल्यावर जबाबदारी टाकली ती पूर्ण आपण करू शकतो,त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी एका आदिवासी महिलेमधील असलेल्या गुणांचा शोध घेऊन महामहिम द्रौपदी मुंर्मु यांना राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर नेले.हा महिलेचा अन आदिवासी समाजाचा मोठा सन्मान आहे.
2030 मध्ये देशातील 60 टक्के महिलांना सक्षमपणे उभे करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे ध्येय असून प्रत्येक महिलेच्या हाताला काम देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे पटेल म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानी होती. आज ती पाचव्या स्थानावर आणण्यात त्यांना यश आले. हे करत असताना ज्या इंग्रजानी आपल्यावर 125 वर्षे राज्य केले त्यांना सहाव्या स्थानावर पोहोचविले. 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आणणार असल्याचा संकल्प सरकारने केला आहे. मात्र, त्यासाठी उद्योग समूहांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अर्थव्यवस्थेत लघू उद्योगांची संख्या 40 टक्के आहे. जुने 1400 कालबाह्य कायदे मोदी सरकारने संपुष्टात आणले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोकळीक दिली तर प्रशासन चांगले चालते. त्यामुळे त्यांना मोकळीक दिली आहे. मोदी सरकारने जनतेला घरे, शौचालये, वीज व आरोग्य यासारख्या योजनांचे लाभ पोहोचविले आहे. 2030 पर्यंत साठ टक्के महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
देशात सुमारे चोवीस लाख बचत गट आहेत. या माध्यमातून आपण अनेक पदार्थांची निर्मिती करतो. देशात, परदेशात खाद्य पदार्थ निर्मितीला मोठा वाव आहे. अनेक परदेशी कंपन्या आपल्याकडून स्वस्तात माल घेतात आणि यावरच कोट्यवधी रुपये कमवतात. देशात फक्त ११७ अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. ते देशाची गरज सुद्धा भागवू शकत नाहीत तेव्हा जगाची कधी भागणार असा प्रश्न उपस्थित केला.
नवरात्रीच्या शुभ पर्वमध्ये इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहे याबद्दल कौतुक करीत या मेळाव्यासाठी युवतींचे प्रमाण जास्त आहे, त्यांच्या वर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. युवक युवती यांच्या हातात देशाचे

नवरात्रीच्या शुभ पर्वमध्ये इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहे याबद्दल कौतुक करीत या मेळाव्यासाठी युवतींचे प्रमाण जास्त आहे, त्यांच्या वर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. युवक युवती यांच्या हातात देशाचे भवितव्य आहे. त्यांनी मोठे स्वप्न पहावे व भविष्यात नेहमी पुढचा विचार करावा. सर्वानी गेल्या 75 वर्षात महिलेला सन्मान दिला नाही, त्यांना बरोबरीने वागवले नाही, त्यांना कायम कमकुवत समजलो, आता ही आपल्याला या चूका सुधारण्याची संधी आहे.असे आवाहन केले.कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी साठ टक्के महिला आहे.त्यांच्या ताकदीचा आपण वापर केल्यास हा देश प्रगती पथावर राहील, त्या अर्थव्यवस्थेला ताकद देऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महिला जिल्हा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ.सोनालीताई नाईकवाडी यांनी स्वागत केले व पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर सर्व महिला वर्ग असून शिर्डी लोकसभा मतदार संघात कमळ फुलवू असा विश्वास दिला.केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी अनेक योजना राबविल्या असून त्याबद्दल धन्यवाद मोदीजी असे म्हणत केंद्र सरकारने महिलांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यावेळी बचतगटाच्या सौ.शोभाताई शिंदे व आरोग्यसेविका शारदाताई मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले.
सूत्रसंचालन श्रीमती अलका मंडलिक यांनी केले तर आभार अंजली सोमाणी यांनी मानले. यावेळी काही कर्तबगार महिलांचा सत्कार केंद्रीय मंत्री पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.