पंडिता सौ. मंजिरी असनारे केळकर यांचे आज शास्त्रीय गायन

नाशिक-शनिवार १ ऑक्टोबर २०२२ रात्रौ ८ वा सुप्रसिद्ध गायिका पंडिता सौ. मंजिरी असनारे केळकर
यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. मंजिरीताई जयपुर आतरोली घराण्याच्या गायिका आहेत.
पद्मविभूषण गान सारस्वती किशोरी अमोणकर यांच्या त्या शिष्या आहेत. आपले वडील स्व.आनंद
असनारे प्रसिद्ध तबला वादक होते. पंडित. सी.टी म्हैसकर, पंडित एम.एस. कानेटकर,यांच्या कडून
ताईंना संगीताची तालिम लाभली आहे. ताईंना आजपावेतो अनेक सम्मान व पुरस्कार प्राप्त झाले
आहेत. त्यातील प्रामुख्याने हिराबाई बदोडेकर गानहिरा, संस्कृति पुरस्कार २००३, पहिला बिस्मिल्लाह
खान पुरस्कार २००६, संगीत नाटक अकॅडेमी , प्रथम गान सरस्वती पुरस्कार २०१७ मध्ये गान
सरस्वती किशोरीताई अमोणकर यांच्या स्मरणारथ,
ताईंनी आज पर्यन्त अनेक राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय संगीत सभानमध्ये आपली गायकी सादर केली आहे.
यात प्रामुख्याने सवाई गंधर्व समारोह, पुणे, आयटीसी समारोह, कोलकत्ता, पंडित पालुसकर समारोह,
नवी दिल्ली, तानसेन समारोह, ग्वालियर, दरबार फेस्टिवल लंडन, पार्लियामेंट वर्ल्ड रीलीजन
ऑस्ट्रेलिया, तसेच अमेरिका, होलंड, बेल्जिअम, फ्रांस, सिंगापूर आदि ठिकाणचा समावेश आहे.
यंदाच्या ब्रह्मोत्सवातील आपल्या बैठकीत ताईंना संवादिनी वर श्री.ज्ञानेश्वर सोनवणे, तबल्यावर
श्री.नितिन वारे व तानपुर्यावर देवश्री नवाघरे साथ करणार आहेत. कार्यक्रम श्री,व्यंकटेश बालाजी
मंदिर , कापड पेठ, येथे, शनिवार ठीक रौत्री ८ वा होणार आहे. श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या
कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री.व्यंकटेश बालाजी संस्थान तर्फे करण्यात आले आहे.