बुब मेमोरियल ट्रस्ट व अराईज संस्थेकडून टाकळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अकोले प्रतिनिधी:-
Oअखिल भारतीय स्तरावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवाव्रत जपणा-या श्री व श्रीमती रामनारायणजी बुब मेमोरियल ट्रस्ट व अराईज फाउंडेशन पुणे यांच्याकडून टाकळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची वाॅटर प्रुफ स्कुल बॅग, चार वह्या, ड्राॅईंग बुक, वाॅटर बाॅटल व ज्ञानरचनावादावर आधारित स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
या साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब फोडसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थापत्य अभियंता श्रीकांत नवले उपस्थित होते. याशिवाय पोपटराव शेवाळे, नाना गायकवाड, दत्ताराम दातखिळे, विनायक गाडे, दादा पाटील तिकांडे, जनार्दन गायकवाड, विजय मदगे, श्रीमती रोहिणी पवार, सुनंदा तिकांडे, अलका गांगड, कमल चासकर तसेच मोठ्या संख्येने टाकळी गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व प्रतिष्ठित मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
या आनंदमयी कार्यक्रमाला देवठाण बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप केले. टाकळी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या स्तुत्य उपक्रमाचे अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी अभिनंदन व कौतुक केले.
आपुलकीच्या मिशन अंतर्गत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला टाकळी शाळेतील विद्यार्थ्यांना अनमोल भेट मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.श्रीनिवास पोतदार, सहशिक्षिक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संजय शिंदे यांचे अभिनंदन केले.