राष्ट्रीय सेवा योजनेतून संस्कारक्षम
विद्यार्धी घडविण्याचे कामं -वैभव पिचड
अकोले /प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून संस्कारक्षम विध्यार्थ्यांना घडवीण्याचे कामं होत असून ते देशाचे भावी सुजाण नागरिक होतील अशी अपेक्षा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.
देवठाण येथे हिंद सेवा मंडळ संचालित मॉर्डन जुनिअर कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीराच्या समारोप कार्यक्रमात पिचड बोलत होते. कार्यक्रम अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके होते. यावेळी जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, हिंद सेवा मंडळ चे सहसचिव दिलीप शाह, प्राचार्य प्रा. संतोष कचरे, भाजपा तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अमृतसागर दूध संघांचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, संचालक प्रवीण धुमाळ, रामदास आंबरे, देवठाण सरपंच निवृत्ती जोरवर, केशव बोडके आदी होते.
श्री. वैभवराव पिचड बोलताना म्हणाले की, मॉर्डन कॉलेज हे गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याबरोबर संस्कार देण्याचे कामं करीत आहे. प्राचार्य संतोष कचरे म्हणाले की, मॉर्डन जुनिअर कॉलेज हि संस्कारश्रम संस्था असून विध्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे काम केले आहे. भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे म्हणाले स्वयंशिस्त, व्यायाम, लवकर उठणे, अध्ययन, देशाचे सुजाण नागरिक घडवीन्याचे कामं हिवाळी शिबीराच्या माध्यमातून होते. हीच शिदोरी आयुष्यभर विद्यार्थी घेतील अशी अशा व्यक्त केली.
हिवाळी शिबिराचे उदघाट्न हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांच्या हस्ते झाले. विध्यार्थ्यांनी आढळा नदी स्वच्छता, स्मशानभूमी परीसर स्वच्छता परीसरात रंगरंगोटी आढळा नदीपात्र रुंदीकरण, ग्रामस्वच्छता, गहीनीनाथ टेकडीचे स्वच्छता व वृक्षसंवर्धन व सिमेंटचे ब्लॉक लावणे हि कामे केली.या शिबिरात डॉ. यशश्री डावरे यांनी आरोग्य व् शिक्षण, हभप् राजेंद्र नवले यांनी संत परंपरा, बायफ चे विभागीय अधिकारी जतीन साठे यांनी ग्रामीण विकासात तरुणचा सहभाग, सुधीर फरगडे यांनी करिअर मार्गदर्शन, ज्ञानेश बागुल यांनी अभ्यासाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य दीपक जोंधळे यांनी केले. कार्यक्रम चे अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत वाळके यांनी सुत्रसंचालन प्रा. मंगल कोल्हे यांनी तर आभार प्रा. बाळासाहेब भोत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केदार भिंगारदिवे, ऋषिकेश नगरकर यांनी प्रयत्न केले. यावेळी आदर्श स्वयंसेवक कु. प्रतिक्षा घुले, साहिल पारधी, सोमनाथ सहाणे, बबलू जोरवर, देविदास कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.