
नाशिक : इंटरएक्ट क्लब ऑफ विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज गोवर्धन आणि पेरेंट क्लब रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आंतरस्कूल बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विविध १२ शाळांमधील ८० मास्टरमाइंड्सनी सहभाग घेतला.
रोटरी क्लब ऑफ नाशिक अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरॅक्ट क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना बौद्धिक चालना मिळावी या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- गट १ चे विजेते (इयत्ता ७वी, ८वी, ९वी मुले) प्रथम – मस्त जीवेश शेकटकर (एम.एस.कोठारी अकादमी), द्वितीय – शौर्य छाजेड (विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल) गट १ चे विजेते (इयत्ता ७वी, ८वी, ९वी मुली) प्रथम – अनुष्का बडगुजर, अशोका युनिव्हर्सल स्कूल, द्वितीय – रुतुजा सोनवणे, होरायझन अकॅडमी, सिन्नर गट २ चे विजेते (इयत्ता १०वी, ११वी, १२वी मुले) प्रथम – आयुष मंत्री, अशोका युनिव्हर्सल स्कूल, द्वितीय – सौम्य साळवे, विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल गट २ चे विजेते (इयत्ता १०वी, ११वी, १२वी मुली) प्रथम- वृंदा राठी, विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, गोवर्धन द्वितीय – शाल्वी बिन्नर, होरायझन अकादमी, सिन्नर यांनी विजेतेपद पटकावले. याशिवाय दोन्ही वयोगटातील ४ उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली.
प्रारंभी रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया आणि विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या सीईओ वर्षा माहोरे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट चेअर अदिती अग्रवाल, ग्रुप कॅप्टन देवधर, इंटरॅक्ट संचालक सुचेता महादेवकर उपस्थित होते. स्विस लीग पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलचे आनंद यशवंते आणि तुषार गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. इंटरॅक्ट क्लब विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या टीमने या स्पर्धेचे आयोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले. विद्यार्थ्यांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
रोटरी क्लबचे सचिव ओमप्रकाश रावत आणि विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निलुफर चव्हाण, इंटरॅक्ट संचालक किर्ती टाक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यजमान क्लबच्या अध्यक्षा सारा यांनी विद्यार्थ्यांना क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली. अनय कुलकर्णी यांनी आभार मानले.