अकोले येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन साजरा
अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तालुक्यातील सैनिक,कोरोना योद्धा, आदर्श शिक्षक व महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा केला
मेजर काशिनाथ गंभीरे, कोरोना योद्धा डॉ.अशोकराव धिंदळे,सेवा निवृत्त आदर्श शिक्षक शांताराम वैद्य,महिला प्राचार्य सौ.मीनाताई नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोले व परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कुल यांचा एकत्रितपणे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कुल च्या प्राचार्या सौ.मीनाताई नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान,नवी दिल्ली यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिजिटल संगणक प्रशिक्षित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वितरित करण्यात आले.
परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कुलच्या चिमुकल्यानी सूत्रसंचालनासह स्वातंत्र्य दिना वर भाषणे,नाटिका व नृत्य सादर करीत सर्वांचे मने जिंकली.
यावेळी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. व आजच्या बेरोजगारी च्या काळात प्रत्येक तरुणाच्या हातात कौशल्य असण्याची गरज असून कौशल्य असेल तर तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकतो. असे प्रतिपादन केले.
यावेळी कोरोना योद्धा यांनी कोरोना काळातील आपले अनुभव कथन करीत राष्ट्रासाठी सर्वानी आपले कर्त्यव्य पार पाडावे. असे मत व्यक्त केले.
यावेळी शांताराम वैद्य व प्राचार्या औ.मीनाताई नवले यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा परिसर फुलांनी सुंदर सजविण्यात आला होता.
यावेळी दोन्ही दोन्ही संस्थांचे सर्व कर्मचारी,विद्यार्थी व महिला व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यशस्वी ते साठी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, प्राचार्या सौ.मीनाताई नवले,गट निदेशक मच्छिंद्र गायकर सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
