इतर

शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातील धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकासाला प्राधान्य दिले – चंद्रशेखर घुले


माजी आमदार चंद्रशेखर घुले सौ.राजश्रीताई घुले यांच्या हस्ते स्वयंभू काळेश्वर देवस्थान ची महापूजा

शहाराम आगळे /शेवगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाबरोबरच देवस्थान विकासकामात शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना प्राधान्य देऊन आपल्याला तीर्थक्षेत्रांचा विकास करता आला याचे घुले कुटुंबियांना यांचे समाधान आहे. यापुढील काळातही आपण स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे मत महापूजेनंतर झालेल्या सत्कार समारंभात माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी व्यक्त केले.
शेवगाव -नेवासा राज मार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील श्री स्वयंभू काळेश्वर देवस्थानात श्रावण पर्वणीनिमित्त तिसऱ्या सोमवारी सालाबाद प्रमाणे याही वर्षी घुले कुटुंबीयांनी अभिषेक महापूजा करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला. यावेळी भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर व सौ नंदाताई नारळकर यांच्या हस्ते घुले कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव मेरड, माऊली खरड, उज्वलाताई मेरड, विठ्ठल फटांगरे, संतोष मेरड, अशोक फटांगरे, बाबासाहेब साबळे, डॉ.दिनेश राठी, शेषेराव काळे, भास्कर चोपडे, रामभाऊ तोगे, आजिनाथ खरड, विठ्ठल चोरमारे, सचिन पानसंबळ, नवनाथ आठरे, जालींदर नजन, नितीन खंडागळे, जालीदर आठरे, पांडुरंग चोपडे, महेश नारळकर, देवीदास खेडेकर रामकिसन खेडेकर याच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलभूमीचे बाळासाहेब जाधव यांनी केले. तर बापुसाहेब लोढे यांनी आभार मानले.


श्रावणी सोमवार निमित्त श्री स्वयंभू काळेश्वर देवस्थानमध्ये हजारो भाविकांनी दर्शन घेतले यावेळी उपस्थित भाविकांना सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button