माका येथे कृषि दुतांचे आगमन

दत्तात्रय शिंदे /माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका गाव येथे कृषि महाविद्यालय , भानसहिवरेच्या आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ते गावात वास्तव्यास राहून ते शेतकऱ्यांना विविध कृषि विषयक मार्गदर्शन करणार आहेत.
या कृषिदुतांचे माका येथील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मार्गदर्शक कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरभटमट सर व तसेच कार्यक्रम समन्वय प्रा. मनोज माने सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप सोनवणे सर असून या गावामध्ये कृषिदूत आवारे लक्ष्मीकांत, बडे अभिमन्यू ,गिरी रोहन , चौरे वैभव, गुंजाळ शुभम आणि दुसंगे गणेश हे विद्यार्थी आहेत.
या कृषिदूतांचे माका गाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच सौ. विजया पटेकर व ग्रामविकास अधिकारी एल. डी. नांगरे तसेच सोपन घुले , अमोल पालवे, गोवर्धन रुपनर आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते