अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री .संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सावता महाराज तरुण मंडळ,माळी समाज व नेप्ती ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले यांनी दिली आहे.
बुधवार दि. ३१ जुलै ते शनिवार दि.३ऑगस्ट या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. या सप्ताहात सायंकाळी ५ ते ७ या वेळात हरिपाठ व सायंकाळी७ ते ९या वेळात कीर्तन हे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या किर्तनाला हरीहरेश्व़र वारकरी संस्था इसळक व नेप्ती भजनी मंडळ साथसंगत करणार आहेत. बुधवार दि.३१ जुलैला सायं. ७ ते ९ या वेळात भाग्यश्रीताई महाराज शिंदे केडगाव यांचे कीर्तन होणार असून गुरुवार दि.१ऑगस्ट रोजी सायं.७ते ९या वेळात महादेव महाराज घोडके घोसपुरी यांचे कीर्तन होणार आहे तर शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सायं.७ ते ९या वेळात तुळशीराम महाराज लबडे भातोडी यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दि. 3 ऑगस्टला सकाळी ९:३०ते ११:३० या वेळात शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी पंचकोशीतील भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.