इतर
डॉ. ज्योतीताई मेटे यांची भातकुडगावला सदिच्छा भेट !

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मराठा समाजाचे नेते माजी आमदार स्वर्गीय विनायक मेटे यांच्या धर्मपत्नी डॉ. ज्योतीताई मेटे यांनी शारदीय नवरात्र उत्सवाच्या औचित्य साधून सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांचे चर्चा केली. या भेटीदरम्यान आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना स्वर्गीय साहेब बहुजनांसाठी करत असलेले काम व विशेषतः मराठा समाजासाठी ते काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आपण साखळी निर्माण करूया शेतकऱ्यांच्या उसा संदर्भातील प्रश्न तेल च्या भागातील लोकांना पाण्याचा प्रश्न यावर भविष्यात आपण लक्ष घालणार आहोत अशाही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की मी राजकीय प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया सध्या देऊ इच्छित नाही. अजून मला खूप काम करायचे आहे. त्यासाठी आपण एकत्र यावे असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी व सर्वसामान्यांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी आपण सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूलाच खंबीरपणे उभे राहू असे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले तर विविध पक्षातील पदाधिकारी व संघटनां तील कार्यकर्त्यांसह महिलावर्गांनी त्यांचं स्वागत केलं.
भातकुडगाव येथे नवरात्र सप्ताहाला भेट दिल्यानंतर सप्ताहाचे आयोजक चंदूभाऊ फटांगरे व सौ. अनिताताई फटांगरे यांनी त्यांचे स्वागत करून कार्यक्रमास भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस संदीपराव बामदळे,
शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष नवनाथ ईसरवाडी, नेवासा तालुका अध्यक्ष श्याम ढोकणे,लक्ष्मण लव्हाळे, तुकाराम लव्हाळे भातकुडगावचे माजी सरपंच राजेश फटांगरे, विकास सेवा संस्थेचे चेअरमन सचिन फटांगरे, विकास गटकळ, अशोक कुसळकर, बबन माने, विनोद कवडे, हरिचंद्र जाधव, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कळमकर तर चंदू फटांगरे यांनी आभार मानले. यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.