पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या उपस्थितीत औंढा पट्टा विश्रामगड येथे वाघबारस संपन्न

अकोले प्रतिनिधी
शिवरायांचे मावळे झालो,राघोजींचे बंडकरी झालो, खूप मोठा घडला इतिहास पण इतिहासातून आदिवासी मात्र गायब झाला. आदिवासी जिंदाबाद,हर हर महादेव,राघोजी भांगरे उलगुलान,बिरसा मुंडा उलगुलान,संविधान वाचवू,मनवादी विकृतीला मातीत गाडू,अश्या घोषणा देत अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील शेवटच टोक असलेले नाशिक अहमदनगर सरहद्दीवर असलेले औंढा पट्टा राघोजी ची खांड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे राघोजी ब्रिगेड आयोजित आदिवासी सामाजिक विचारमंच आढळा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने वाघबारस साजरी करण्यात आली.

समाजास वाघबारसीचा विसर पडू नये व आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी ब्रिटिश विरोधी उभारलेल्या बंडाचा संबंध राघोबाच्या खांडीशी येतो या ठिकाणच्या इतिहासाला उजाळा मिळावा म्हणून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी बांधव हा निसर्गपूजक पापभिरू दैववादी अत्यंत भोळा व प्रामाणिक असून त्यांचे दैवत जल, जंगल आणि प्राणी हे आहेत. म्हणून वाघ देवता ची पूजा करून दिवाळी सणाला प्रारंभ होत असतो.या दिवशी आदिवासी संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते.
कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी वाघोबाला आदिवासी परंपरेनुसार खिरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.राघोजी भांगरे यांची आरती करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी प्रतिमेचे पूजन बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे,माधुरी भांगरे,सोमनाथ भांगरे,काळू भांगरे,यांनी केले.आदिवासी सामाजिक विचार मंच आढळा प्रतिष्ठानचे संस्थापक सोमनाथ विठ्ठल भांगरे सत्यभामा केटरर्स यांच्या सौजन्याने खिर वाटप करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे,दिलीपराव भांगरे (सरपंच शेंडी) प्रमुख वक्ता काळु भांगरे,मार्गदर्शक संतोष पोपेरे,आदिवासी व्याख्याते
संतु जाधव,भाऊराव जाधव,ज्ञानेश्वर जाधव,मयूर डोंगरे,सुलोचना जाधव,विठ्ठल गोडे,सचिन भांगरे,नितीन साबळे,नामदेव जाधव,विशाल कुंदे,भगवान खोकले आधी उपस्थित होते.