इतर

कार्यकर्ता हीच माझी ताकद – आमदार लंके 

१ लाख २६ हजार महिला भाविकांनी घेतले मोहटादेवीचे दर्शन. 

          अहमदनगर प्रतिनिधी     

शारदिय नवरात्र उत्सवात गेल्या पाच वर्षापासून मतदार संघातील महिला भगिंनींना मोहटा देवीचे दर्शन घडवणे, तीला परत सुखरूप तीच्या घरापर्यंत पोहचवणे हे राजकारण नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून मी ही जबाबदारी पार पाडत आहे. या सर्व नियोजनात पारनेर आणी नगर तालुक्यातील गावागावातील सर्व कार्यकत्यांचे काटेकोर नियोजनाने पार पडत असल्याने कार्यकर्ता हीच माझी ताकद असल्याचे मत पारनेर- नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केले

आज चांदबिबी महालाच्या  शाहपूर (ता. नगर) पायथ्याशी केले.नगर तालुक्यातील कल्याण रस्तापलिकडील गावांच्या महिलांना  रविवारी व कल्याण रोडच्या अलिकडील गावांना  सोमवारी मोहटादेवी दर्शन घडवले यावेळी ते बोलत होते.

यावेळी समारोपासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे उपस्थीत होते.लंके पुढे म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून आठव्या माळे पर्यंत १ लाख २६ हजार महिला भाविकांना मोहटादेवी दर्शन घडवण्याची ताकद तुम्हा माता भगिंनीच्या आशिर्वादाने मिळाली आहे. आज मुले आपल्या माता- पित्यांना देवदर्शनाचा कंटाळा करतात. मि तुमचा मुलगा म्हणून ही सेवा करत असल्याचे त्यांनी वेळी सांगतानाच पारनेर आणी नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्तांने केलेले नियोजन ही या यशस्वी मोहटादेवी यात्रा दर्शनाची खरी फलस्त्रुती आहे

आमदार निलेश लंके आधुनिक युगातले श्रावणबाळ

 , आजच्या राज्यातील सरकार आज राजकारण म्हणून उपयोग करतात. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सामाजिक कर्तव्य म्हणून ही जबाबदारी पर पाडत आहे. आमदार निलेश लंके हे अधूनिक युगातले श्रावणबाळ आसून ते प्रत्येक माता भगिनींची आपल्या माता-पित्या प्रमाणे सेवा करत आहे. त्यांना नगर आणी पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ता मनापासून सहकार्य व कोटेकोर नियोजनाने हा माता – भगिनींनी देवी दर्शनाचा लाभ मिळत असल्याचे यावेळी राष्ट्रवादी चे महेबूब शेख यांनी सांगितले.

 या नियोजनासाठी सरपंच प्रियंका लामखडे, अजय लामखडे, अनुराधा कांडेकर, शिवा हेळकर, संजय जपकर, वसंत पवार, घनश्‍याम म्हस्के, नितीन कोतकर, हरिदास जाधव, बाबा काळे,सुनीता धनवटे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button