पालकमंत्री विखेंना कोळगावकरांचे रस्ता मागणीचे साकडे ….

श्रीगोंदा /प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि राज्याचे महसूल मंत्री, नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्रीगोंदा तालुक्यात आले असताना कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी मोहरवाडी, तोंडेवाडी, वेठेकरवाडी या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले.
पालकमंत्री प्रथमच श्रीगोंदा दौऱ्यावर असताना कोळगाव येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला व त्यावेळी रस्त्यांसाठी आग्रही भूमिका मांडली. यावेळी सत्कार करताना व निवेदन देताना
सरपंच पती अमोल काळे. उपसरपंच अमित लगड, सुधीर लगड, सोसायटी संचालक धनंजय लगड, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळे, सतीश लगड पाटील, नानासाहेब बांदल, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब लगड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मोहरवाडी ,वेठेकरवाडी, तोंडेवाडी रस्त्याचा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये सामावेश करुन लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावेत याचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. पालकमंत्री विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असे अमित लगड यांनी सांगितले