महिला कामगारांच्या विविध प्रशांबाबत, जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन!

पुणे दि 11
भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध मागण्यांबाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन व महिलां करिता मेळावा
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने महिला कामगारांच्या विविध प्रशांबाबतीत, समस्या बाबतीत चे निवेदन मा जिल्हाअधिकारी कार्यालय पुणे येथे देण्यात आले, या वेळी महत्त्वाचे मागणी-
1) महिला कामगारांना कामाच्या ठिकाणी समान काम समान वेतन व समान वागणूक मिळावी.
2) घरेलु कामगारांना लाभ त्वरित देण्यासाठी मंडळ कार्यान्वित करावे.
3) असंघीटत महिला कामगारांना न्याय देण्या साठी विशेष अभियान राबवावे.
4) मनरेगा प्रमाणे बेरोजगार भत्ता मिळवा.
5) प्रत्येक जिल्हा मध्ये कामगार राज्य विमा योजना ची रुग्णालये स्थापन करण्यात यावी.
ई मागण्या चे मागणी पत्र देण्यात आले. जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या वतीने मा निवासी जिल्हाअधिकारी श्री हिम्मत खराडे यांनी निवेदन स्विकारले.

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने अध्यक्ष अर्जुन चव्हाण, चिटणीस बाळासाहेब भुजबळ, बेबीराणी डे, अभय वर्तक, सुरेश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाच्या वतीने संघटीत, असंघीटत महिला कामगारांचा मेळावा भारतीय मजदूर संघ कार्यालय शनिवार पेठ पुणे येथे आयोजित केला होता. या मेळावा चे उदघाटन मा .डाॅ सुचित्रा कराड नांगरे संचालक मायमर मेडिकल काॅलेज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, या वेळी मा कराड नांगरे म्हणाले की 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन भारतासह जगभर महिला दिन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. महिलानी केवळ चूल आणि मूल यात न अडकता विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहेत, ईतिहासात महिलेला मातेचे स्थान असुन शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ आहे. तर युध्दात रस्ता वर उतरणारी रणरागीणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर असून शिक्षण क्षेत्रात पहिल्या महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले असुन या सावित्री च्या लेकी असून त्यांचा आदर्श ठेवून आपली गुणवत्ता व कर्तृत्व सिध्द करावे असे मार्गदर्शन केले.
या वेळी स्वरूप वर्धीनी च्या जेष्ठ पदाधिकारी पुष्पाताई नडे, अॅड मोहना नातू गद्रे, मनिषा पाठक अॅड संध्या खरे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी समाजात विशेष कार्य केलेल्या चा सत्कार करण्यात आला. या वेळी कोव्हीड लाॅकडाऊन कालावधीत अत्यंसंस्कार, करण्यारे स्वरूप वर्धीनी च्या कार्यकर्ते मनिषा पाठक यांनी अनुभव कथन केले. तसेच बॅंक कर्मचारी सौ योगीनी जोशी, हॉस्पिटल मध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहुन रूण्ग सेवा केलेल्या सौ भागश्री बोरकर यांनी विशेष माहिती सांगीतली. तसेच अॅड मोहना नातू गद्रे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे अधिकार, हक्क, लैंगिक शोषण च्या विरोधात तक्रार पध्दत, नियम ई माहिती सांगितली. पुष्पाताई नडे यांनी सेवा वस्ती तील कार्य, महिला स्वयं रोजगार ई बाबतीत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदना कामठे यांनी केले. प्रास्ताविक तारका शाळिग्राम यांनी केले. या वेळी बॅंक, संरक्षण, विज ऊद्योगातील कंत्राटी कामगार, औद्योगिक, पुणे महानगरपालिका,विज, दवाखाने, ई क्षेत्रातील महिला कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
