आमदार गडाख यांच्या प्रयत्नातून नेवाश्यात १ कोटी २८ लाखांचे नविन प्रशस्त दुय्यम निबंधक कार्यालय!

.
प्रगतीपथावरील कामाची आ शंकरराव गडाखांकडून पाहणी.
नेवासा -येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशस्त इमारतीसाठी तब्बल 1 कोटी 28 लाख रुपये आमदार शंकरराव गडाख यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला असून व 51 लक्ष रु निधी वर्गही करण्यात आला आहे. या नवीन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाची जुनी इमारत ही शंभर वर्षांपूर्वीची असून ती इमारत अत्यंत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. या जुन्या झालेल्या इमारतीत कर्मचाऱ्यांना शासकीय काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते .परिणामी कर्मचाऱ्यांकडून लाभार्थींच्या कामास विलंब झाल्यास त्यांच्यात खटकेही उडतात. त्यामुळे ही नवीन इमारत झाल्यास अनेक शासकीय कामे व दस्त नोंदणी झटपट होऊन लवकर निकाली काढता येतील. नुकतेच आमदार शंकरराव गडाख यांनी नवीन इमारतीच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी दुय्यम निबंधक कार्यालयातील पवार,शाखा अभियंता बाळासाहेब सोनवणे व नेवासा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दुय्यम निबंधक कार्यालयांविषयीच्या तक्रारी व अडचणी यांचे नवीन वास्तूमुळे निराकरण होणार आहे.नेवासा शहरात आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने ही नवीन शासकीय वास्तू पूर्ण झाल्यानंतर दुय्यम निबंध कार्यालयातील दस्तनोंदणी , मुद्रांक शुल्क, मूल्यांकन,ई-पेमेंट, विवाह नोंदणी आदी कामे अधिक झपाट्याने होणार आहेत.
यामुळे आमदार शंकरराव गडाख यांचे तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.
कामाच्या पाहणी प्रसंगी काम गुणवत्तापूर्ण करण्याचा सूचना आ गडाख यांनी यंत्रणेस दिल्या आहेत.