आजचे पंचांग राशिभविष्य दि.१३/१०/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २१ शके १९४४
दिनांक :- १३/१०/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०७,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- आश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २७:०९,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १८:४१,
योग :- सिद्धि समाप्ति १३:५४,
करण :- बव समाप्ति १४:३०,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:४३ ते ०३:११ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२३ ते ०७:५१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:१५ ते ०१:४३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:१५ ते ०३:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:३९ ते ०६:०७ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
संकष्ट चतुर्थी (मुंबई चं.उ. २०:४५), करक चतुर्थी, घबाड १८:४१ नं. २७:०९ प., यमघंट १८:४१ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २१ शके १९४४
दिनांक = १३/१०/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा गोंधळात टाकणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही सहकारी तुमच्या अडचणी वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि तुमच्या पदोन्नतीमध्ये अडथळा आणू शकतील. एखादा करार करताना तुमच्या मनात काय चालले आहे हे कोणालाही सांगणे टाळावे, अन्यथा तो त्याचा फायदा घेऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकेल.
वृषभ
मन शांत राहील, पण विचारांमध्ये चढ-उतार असतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. एखाद्या मित्राकडून चांगले गिफ्ट मिळू शकते. कुटुंबात सुख-शांती नांदेल. जबाबदाऱ्या वाढू शकतात. मान-सन्मानही वाढेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागणे. अनावश्यक खर्च वाढतील.
मिथुन
आज व्यापारी वर्गाला थोडे हुशारीने काम करावे लागेल, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागू शकते. मैत्री घट्ट होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. जर, तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल, तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. घरगुती कामात व्यस्त राहाल.
कर्क
भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. श्रमाचे चांगले फळ मिळेल. मुलांवरील विश्वास अधिक दृढ होईल. आजकुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. शत्रू नाराज होऊ शकतात. आज पालकांची विशेष काळजी घ्या. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. अनावश्यक खर्चांना नियंत्रित करा.
सिंह
आज तुम्हाला राजकारणात नवीन संधी मिळतील. राजकीय खेत्रात यश मिळेल. लव्ह लाईफच्या बाबतीत काही तणाव निर्माण होईल. मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एखादी वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. कुटुंबात सुख-शांती नांदेल. भेटवस्तू मिळेल आणि सन्मान वाढेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या
कुटुंबासोबत कोणत्याही आध्यात्मिक कार्यात उत्तम वेळ जाईल. घरकाम आणि साफसफाईच्या कामात व्यस्त राहाल. करिअरशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने तरुण उत्साही होतील. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्चामुळे बजेट बिघडू शकते. आळशीपणामुळे तुमचे कोणतेही काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका.
तूळ
वाणीवर संयम ठेवा. नियमांविरुद्ध कोणतेही काम करू नका. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक अडचणी निर्माण होतील. खर्च त्रासदायक ठरू शकतात. कुटुंबासोबत दिवस घालवाल. आज तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन टार्गेट देखील मिळू शकते. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे.
वृश्चिक
भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि एखादी मोठी डील फायनल झाल्याने चांगला नफा मिळू शकतो. महत्त्वाचे काम कोणत्याही सहकाऱ्याच्या मदतीने सहज पूर्ण करू शकाल. घरातील सदस्यांमधील वाद संवादाने मिटवण्याचा प्रयत्न करा. आर्थिकबाबींचे व्यवस्थित नियोजन करा.
धनु
आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी काही अडचणी आणेल, परंतु तरीही तुम्ही आपला व्यवसाय सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागेल आणि त्याचे कायदेशीर पैलू व्यवस्थित तपासावे लागतील, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन नोकरी मिळू शकते.
मकर
मनाचा संयम वाढेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. उत्पन्न वाढेल. तुमच्या बोलण्याने एखाद्यावर प्रभाव होऊ शकतो. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. पोटाचे विकार त्रासदायक ठरू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ
आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल. सार्वजनिक ठिकाणी बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. स्थिर मालमत्ता आणि वाहने इत्यादींच्या कागदोपत्री कामात सावधगिरी बाळगा. महिला सौंदर्य प्रसाधने, कपडे आणि दागिने खरेदीवर पैसे खर्च करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. एखाद्या नवीन नात्यात पुढे जाण्याची घाई तुमचे नुकसान करू शकते.
मीन
सरकारी नोकरीत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. काही सरकारी योजनांचा लाभ मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल. कोणतेही अवघड काम सहजतेने पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल. आरोग्याबाबत जागरूक रहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर