इतर

आ.लंके समर्थक सौ.जयश्री साबळे रांधे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी विराजमान !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडीत तसेच रांधे गावचे उपसरपंच संतोष काटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आमदार निलेश लंके याचे कट्टर समर्थक सौ. जयश्री प्रविण साबळे यांनी बिनविरोध निवड झाली आहे

.आमदार निलेश लंके यांनी सौ. जयश्री साबळे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
सरपंच अरुण आवारी गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब यांनी काम पाहिले .

सौ.साबळे यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनीषा रामदास भोसले तर अनुमोदक म्हणून संतोष प्रभाकर काटे यांनी स्वाक्षरी केल्या.यावेळी सरपंच अरुण आवारी,माजी उपसरपंच संतोष काटे,ग्रा प सदस्य दिलीप आवारी गुरुजी, राजाराम झिंजाड,रेश्मा अनवर शेख,अश्विनी हौश्याभाऊ आवारी,मनीषा रामदास भोसले,सुनीता बाळासाहेब आवारी, सामाजिक कार्यकर्ते भगवान पावडे ,आपासाहेब काटे, अनवर शेख, रामदास भोसले, हौश्याभाऊ आवारी साईनाथ झिंजाड ,सेवा सोसायटी संचालक बाळासाहेब आवारी,विनोद फापाळे ,किरण भगवान आवारी ,अनिल आवारी, संतोष साबळे,संतोष लामखडे,तंटामुक्ती अध्यक्ष चांगदेव थोरात,ग्रा.प. कर्मचारी अमोल शिंदे,प्रमोद गायकवाड तसेच इतर मान्यवर हजर होते .
यावेळी बोलताना सौ.साबळे म्हणाल्या की , दोन वर्षापूर्वी रांधे ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक पार पडली होती . त्यावेळेस सर्व सदस्यांना सत्तेतील महत्वाच्या पदांवर समान संधी दिली जाईल असे ठरल्यामुळे आज मला सर्व सदस्यांनी उपसरपंच पदाची बिनविरोध संधी दिली . आमदार लंके साहेबांच्या माध्यमातून मला दिलेल्या निर्धारित वेळेत आदर्श काम करून गावच्या विकास प्रक्रियेत जास्तीत जास्त लक्ष दिले जाईल व जनतेचा विश्वास सार्थकी करण्याचा प्रयत्न केला जाईल यावेळी नवनिर्वाचीत उपसरपंच सौ. जयश्री साबळे यांनी सांगीतले .
श्री.अरुण आवारी गुरुजी यांनीही सर्व सदस्याना संधी देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानुसार आम्ही सर्व जण प्रयत्न करणार असून गावच्या विकास प्रक्रियेत आम्ही नेहमी सोबत असणार आहे से यावेळी सांगीतले .
संतोष काटे यांनीही ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध प्रक्रियेवेळी गावच्या लोकांनी दाखवलेल्या विश्वासला तडा जाऊ न देता येणाऱ्या काळात सर्वांना संधी देत असताना त्याही निवडी बिनविरोध केल्या जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आसे यावेळी आश्वासीत केले .
तर दिलीप आवारी गुरुजी यांनी प्रस्थावीक तर राजाराम झिंजाड यांनी सर्वांचे आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button