वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास आवश्यक — प्राचार्य रमेशचंद्र बेनके

सारोळे पठार येथे बाळेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा
संगमनेर दि १५
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके व पर्यवेक्षक सुनील साबळे जेष्ठ शिक्षक भारत हासे, विश्वास पोखरकर,गंगाधर पोखरकर व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले. हात धुवा दिना निमित्त हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक विठ्ठल फटांगरे यांनी विद्यार्थ्यांना करून दाखविले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री रमेशचंद्र बेनके बोलत होते. भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे .ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची घडण व्यक्तिमत्व विकास साहित्य विकास आणि भाषा विकास यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे विद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात त्यांची आकलनशक्ती वाढते.
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन या दिवशी विद्यालयांमध्ये केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी,शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील या दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जात आहे मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडवण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे .
तसेच जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते बहुतांश वेळेला माणूस आपल्या हाताने अन्नाचे सेवन करतो अशावेळी हात स्वच्छ नसतील तर माणूस स्वतः अनेक आजारांना निमंत्रण देत असतो परिसरात आजूबाजूला अनेक ठिकाणी असंख्य जिवाणू असतात आपण विविध काम करत असताना ते आपल्याही नकळत हाताला चिकटलेले असतात अन्न खाण्यापूर्वी आपण हात स्वच्छ धुतले नाही तर हेच जीवन व आपल्या पोटात जातात आपण आजारी पडतो यावरून आपल्या लक्षात येते की हात धुणे ही मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे
या कार्यक्रम प्रसंगी अशोक जाधव,गोसावी एस.बी. नारायण डोंगरे,चेतन सरोदे, बाळासाहेब डगळे, संजय ठोकळ, हेमंत बेनके,श्रीकृष्ण वर्पे,सोमनाथ सलालकर,विठ्ठल फटांगरे,आप्पासाहेब दरेकर,संतोष भांगरे,भाऊराव धोंगडे, जयराम रहाणे,औटी जी.के.मनोहर कचरे, मंगेश औटी,मोहन वैष्णव आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन तुकाराम कोरडे यांनी केले तर आभार रघुनाथ मेंगाळ यांनी मानले.