मी ओरिजिनल पाटील, कपडे काढण्याची भाषा लोकप्रतिनिधीना शोभते का ?– सुजित झावरे पाटील

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:-
वासुंदे येथे वासुंदे ते खडकवाडी या ७.०० लक्ष रू. रस्त्याचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.
राज्य सरकारच्या माध्यमातून सदर रस्त्यासाठी काही दिवसाअगोदर निधी मंजूर करण्यात आला. सदर रस्ता अत्यंत खराब असल्याने वडगाव सावताळ, खडकवाडी, पळशी, मांडवे, देसवडे, कामटवाडी, वनकुटे तसेच संगमनेर व राहुरी तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असे. सदर गावातील ग्रामस्थांचा मागणीनुसार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली असता अवघ्या दोन महिन्याचा आत निधी मंजूर करण्यात आला. यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, झावरे कुटुंबीय १९६२ सालापासून कोणाचा ना कोणाचा रूपाने आहे.आमचे आजोबा आनंद पाटील, माझ्या आजी हिराबाई पाटील, वडील स्व. दादा देखिल जिल्हा परिषद सदस्य होते, आई देखिल जिल्हा परिषद सदस्य आहेत, वासुंदे गाव एक कुटुंब आहे आणि झावरे कुटुंबीयांनी सातत्याने कुटुंब प्रमुख म्हणुन आपली कुटुंबाची जबाबदारी पार पाडली आहे. मधल्या काही काळामध्ये गावात गालबोट लावण्याचे काम काही मंडळी कडून खालच्या पातळीवर करण्यात आले. मी अडीच वर्षापूर्वी सांगितलं होत पारनेरचा बिहार होणारं आज तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक अंगावरचे कपडे काढण्याची भाषा वापरतात. मुळात २०१९ च्या निवडणुकीत मला खासदार साहेबांच्या शब्दाखातर मी निवडणुकीत थांबलो,नाही तर तालुक्यातील चित्र वेगळं असत. अत्यंत खालच्या पातळीवर टिका केली जाते. ही लोकप्रतिनिधीला न शोभणारी आहे.मी ओरिजनल पाटील आहे मी जर माझी पातळी सोडली तर ूरणार नाही. पाटीलकी मला हि परमेश्वराने दिली आहे. वासुंदा हे गाव एक कुटुंब व सुसंस्कृत विचारांचे गाव आहे. या गावाने अनेक विद्यार्थी घडवले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडील जेष्ठ नागरिकांचे पाय पडतात. परंतू ६२ वर्षाचा म्हतारा मुलाच्या वयाच्या पोरांच्या पाय पडत. वासुंदे गाव कधी कोणापुढे झुकले नाही. परमेश्वर पाहतो तुमची पेन्शन ३०,००० रू. मग ५ कोटीचा बंगला बांधायला पैसा आला कुठून, गोर गरीब जनतेने विश्वासाने ठेवलेल्या ठेवीच्या पैशावर मौज मजा केली जात आहे. आतापर्यंत गावात एका मंदिरासाठी कधी एक पैसा दिला नाही, वरून लोकांना सांगतात मंदिर बांधण्यासाठी पैसे देऊ नका, गावात कधी एक विकासकाम आणता आले नाही. स्वत: च्या स्वार्थासाठी लाचारी पत्कारतात. माझ्याकडे गेले १५ वर्षा पासुन कोणतीही सत्ता नाही, मी साधा ग्रामपंचायत सदस्य ही नाही मग सुजित झावरे पाटील यांची भीती आपल्याला का वाटत आहे. आपण फक्त एक काम करा आपण केलेल्या विकास कामाची फाईल आणि मी केलेल्या विकास कामांची फाईल यामध्ये मी उजवा नाही ठरलो तर राजकारण सोडून देईल. लोकांमध्ये सभ्रम निर्माण करायचा काम मात्र शून्य आपण ज्या गावात राहतात त्या गावची पाणी योजना सुजित झावरे पाटील यांनी केली आहे हे विसरू नका. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत परंतु द्वेष नसावा. पारनेर तालुक्यातील जनता सुज्ञ आहे जशी डोक्यावर घेते तसी पाडायला सुद्धा कमी करणार नाही. पारनेर तालुका वैचारिक विचाराचा तालुका आहे. गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष तसेच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात भरीव असा निधी आणता आला. खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रीय वयाेश्री योजने अंतर्गत पारनेर तालुक्यात जिल्ह्यात नाही तर राज्यात सर्वात जास्त वयोवृद्ध नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील रस्त्यासाठी २० कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर केला. आता राष्ट्रीय जल जीवन मिशन योजने अंतर्गत १०० कोटी रुपये निधी पारनेर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर केलेे.