इतर

मंदिरावर वीज पडली मंदिर कोसळले!

निमगाव पागा येथील घटना

संजय साबळे /संगमनेर प्रतिनिधी
आज मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या जोरा च्या वादळी पावसात एका मंदिरावर वीज पडली या विजेची तीव्रता एवढी भयानक होती की काही क्षणात मंदिराचा घुमट कोसळला

संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील पेमगिरी रोड वरील रेणुका माता मंदिरावर दुपारी साडेचार वा च्या सुमारास अचानक वीज पडली

मेघ गर्जने सह आलेल्या पावसात रेणुकामाता मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने संपूर्ण घुमट निखळून पडला आहे. यामुळे मंदिरा चा दरवाजा तुटून 50 फूट लांब जाऊन पडला व कळसाचा सर्व भाग धाडकन कोसळला.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे सर्व शेती पिकांचे नुकसान झाले आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहे अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही

,आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात केली.
पावसाला सुरुवात होताच विजेच्या गडगडाट सुरू झाला अचानक पेमगिरी रोड येथील रेणुका मातेच्या मंदिरावर जोराची वीज कोसळल्याने रेणुका माता मंदिर उध्वस्त झाले .


परिसरामध्ये मंदिरालगत लोकवस्ती परंतु, कोणतीही जीवित हानी झाली नाही , मंदिर उद्ध्वस्त झाले असले, तरी देवीच्या गाभाऱ्यातील देवीची मूर्ती ही सुरक्षित असून, देवीच्या मूर्तीला व चौथर्‍याला कोणतीही हानी पोहचली नाही

दुसऱ्या वरचे संकट आपल्यावर घेऊन सर्वांना वाचवले असल्याची भावना येथील महिला व नागरिकांनी बोलून दाखवली. निमगाव पागा चे पोलीस पाटील राजेंद्र कानवडे यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली


दुसऱ्या वरचे संकट आपल्यावर घेऊन सर्वांना वाचवले असल्याची भावना येथील महिला व नागरिकांनी बोलून दाखवली. निमगाव पागा चे पोलीस पाटील राजेंद्र कानवडे यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button