
आमदार मोनिकाताई राजळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पाथर्डी प्रतिनिधी
शेवगाव -पाथर्डी तालुक्यात गेल्या सतत पडणार्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत.
त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे समक्ष भेट घेतली व पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांची व्यथा मांडली. गेल्या १० ते १५ दिवसापासुन सतत पाऊस पडत आहे त्यामुळे खरीप हंगामातील शेतकयांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिपावसामुळे प्रामुख्याने कापुस, तूर, बाजरी, मका, सोयाबीन आदि खरीप हंगामातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.अजूनही पावसाचा जोर कायम असुन उभ्या पिकांमध्ये सर्वत्र पाणी साचलेले आहे. पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकर्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली