इतर

समाजकारणाचे रणांगण सोडणार नाही विजयराव औटी यांचा एल्गार!

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

 वारणवाडी, कामटवाडी, हांडेवाडा ता. पारनेर येथे १४६.५० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.  कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उपतालुका प्रमुख सुनिता मुळे, कैलास न-हे, अक्षय गोरडे, अमोल रोकडे, वारणवाडी सरपंच संतोष मोरे, पोखरी सरपंच सतीश पवार, देसवडे सरपंच पोपट दरेकर, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकुडे, अण्णा पवार, ग्रामपंचायत सदस्य विकास रोकडे, प्रकाश घाडगे, भाऊसाहेब आहेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना औटी म्हणाले मी आमदार झालो तेव्हा माझ्यासमोर त्रिसूत्री होती.शेतीला वीज, उत्तम रस्ते आणि शेतीला पाणी, विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे ती सतत चालणार. खऱ्या अर्थाने सरपंचाला जे कळाले  हे काम कोणी केले त्यासाठी कोणी अधिकारी पाठवले आपल्याकडे त्यांनाच भूमिपूजनाला बोलावले पाहिजे. दाते सरांच्या आशीर्वादाने हे काम झाले याचे सर्व श्रेय सरपंच संतोष मोरे यांना आहे. भ्रष्टाचार हा देशाला लागलेली कीड आहे प्रत्येकाला वाटते मला अगोदर मिळावे आणि हे परिवर्तन करण्याचा मी पंधरा वर्षे प्रयत्न केला. एखादा कार्यकर्ता तहसीलमध्ये काम होत नसल्यास खाली चाललो म्हटल्यावर लगेच त्याचे काम करून दिले जायचे. का ? तर मी पापाचा धनी नव्हतो. आजही मी पारनेरलाच राहतो, की जी आत्मीयता लागते, ज्या समाजात मी जन्माला आलो, लहानचा मोठा झालो, वावरलो, त्या समाजाचे माझ्यावर काही ऋण आहे, हे फेडण्यासाठी माझे आयुष्य आहे ही शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली म्हणून ते दहा वर्षे आमदार होते आणि मी पंधरा वर्षे आमदार राहीलो. जनता वेडी नाही, ठीक आहे एखादा पराभव होत राहतो, इंदिरा गांधींचा ही पराभव झाला लोकांना काय सहन होत नाही? त्यांनी हाय कोर्टाच्या विरोधात जाऊन पंतप्रधान पदाच्या अधिकाराचा गैरवापर लोकांना आवडला नाही. उद्या त्याचीच पुनरावृत्ती या मतदारसंघात झाल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नका रणांगण सोडून पळणारा मी माणूस नाही. वयाची २७ व्या वर्षी विधानसभा लढवणारा मी आहे. आंदोलनातून घडलो आहे भारतीय शेतकरी पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख ५५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेत, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली.

आज तालुक्यात प्रचंड पाऊस पडतोय, शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे कोणी करायचे यासाठी लोकप्रतिनिधी असतो. सरकारने यासाठी कायदे केले आहेत पण ते वाचणार कोण ? सध्या कोण किती वाजता झोपतो व कोण किती काम करतो याची स्पर्धा चालू आहे. मी काय सभागृह पाहिले गोपीनाथराव मुंढे आमच्या बाजूला बसायचे, डॉ. पतंगराव कदम समोर बसायचे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख राजाच! राजबिंडा माणूस!  निर्णय घेताना महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून घ्यायचे. आता काय चालले याचा विचार तुम्ही करा. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकी जर तुम्हाला उमेदवार देता आला नाही तर कशासाठी नाटक केले. धनुष्यबाण आम्हालाच पाहिजे? शिवसेना आम्हालाच पाहिजे? नाहीतर गोठवलं पाहिजे? पण जनता तुम्हाला माफ करणार नाही दुसऱ्याचं वाटोळ केले. तुमचेही झाल्याशिवाय राहणार नाही आता आमच्या हातात मशाल आहे तुम्हाला कात्रजचा घाट दाखवणार तुम्हाला इतिहास माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले ते आणि त्या इतिहासाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. राजकारण करताना समाजाचे प्रबोधनही केले पाहिजे. समाजाला योग्य दिशा दाखवणे गरजेचे आहे. जर समाज चुकीच्या दिशेने जात असेल तर त्यांना जागेवर आणण्यासाठी राजकारण करायचे असते ही आपली जबाबदारी आहे. यावेळी प्रियंका खिलारी, भाऊसाहेब टेकुडे, अक्षय ढोकळे, अमोल रोकडे, सुनिता मुळे, संतोष गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले.

जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत कामटवाडी, हांडेवाडा पाणीपुरवठा योजना करणे-१३२.०५ लक्ष, जिल्हा परिषद प्रा. शाळा कामठवाडी खोली संरक्षण दुरुस्ती करणे-७ लक्ष, जिल्हा परिषद प्रा. शाळा हांडेवाडा खोली दुरुस्ती करणे-२ लक्ष, कामठवाडी येथे सार्वजनिक शौचालय बांधणे-३ लक्ष, कामठवाडी खंडोबा मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे – २.५० लक्ष. 

यावेळी ग्राम. सदस्य संजय काशीद, साहेबराव रोकडे, बबन काशीद, बाळू कोकाटे, बंडू कोकाटे, बाळासाहेब काशीद, संदीप काशीद, पंढरी कोकाटे, भाऊसाहेब बेलकर, सुरेश बेलकर, साहेबराव काशीद, रमेश कारंडे, अशोक पिंगळे, अर्जुन पिंगळे, अशोक डोमाळे, हिरा कारंडे, धोंडीबा डोमाळे, पांडुरंग कारंडे, तुकाराम कारंडे, सतीश पिंगळे, मथु पिंगळे, धोंडीभाऊ काळे, नाथा ढेकळे, देवराम हांडे, पांडू सुळ, चिमा सूळ, बबन कारंडे, दत्ता काळे, बाळू कारंडे, खंडू डोमाळे, यशवंत हांडे, किरण हांडे, विलास पिंगळे, सुजित कारंडे, अजित कारंडे, प्रवीण पिंगळे, अतुल पिंगळे, अक्षय कारंडे, भाऊसाहेब दरेकर, उत्तम भोर, पांडुरंग दरेकर, ममता टेकुडे, साहेबराव फटांगरे, रावसाहेब फटांगरे, देविदास साळुंखे, संतोष गागरे, इंद्रभान ढोकळे, स्वप्नील गागरे, गणेश गागरे, मारुती केदार, रंगनाथ दुधवडे, योगेश दाते, गोविंद आग्रे, खंडू गुंजाळ, चंद्रकांत वाळुंज, मारुती वाळुंज, विठ्ठल वाळुंज, पांडुरंग भालके, साहेबराव मोरे, प्रवीण आहेर, किरण आहेर, महादू आहेर, कारभारी आहेर, प्रभाकर आहेर, प्रशांत मोरे, अविनाश आहेर, अनिल गुंजाळ, अक्षय काळे, संतोष आहेर, मयूर मोरे, साहिल मोरे, दिलीप मोरे, पांडुरंग मोरे, सयाजी मोरे, संदीप मोरे, निलेश आहेर, संतोष माने, अशोक मोरे, शरद आहेर, अविनाश काळे, सुरेश गुंजाळ, दत्ता मोरे, पंकज आहेर, रामदास मोरे, ग्रामसेवक वाळुंज, कामाचे ठेकेदार बबन वाळुंज, संचित वाळुंज, जयवंत वाळुंज, नरेंद्र पोळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता आहेर यांनी केले तर आभार उपसरपंच जानकू दुधवडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button