अहमदनगरक्राईम

घाटघर प्रकल्पाच्या ६५ के .व्ही जनरेटर चोरीचा गुंता सुटेना!

चोरीच्या प्रकरणात अधिकाऱ्यांचा हात ?

भंडारदरा / संजय महानोर
अकोले तालुक्यातील घाटघर येथुन चोरीला गेलेले ६५ के व्ही चे जनरेटर चोरी प्रकरण अजुनही गुलदस्त्यात आहे अधिकारी वर्ग रितसर चोरीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने या चोरीला वेगळेच वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे .
अकोले तालुक्यातील घाटघर येथे घाटघर उंदचन प्रकल्पाचे उर्ध्व धरण असुन या धरणाचे काम सुरु असताना विज गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणुन घाटघर उदंचन प्रकल्पाच्या कार्यालयाने त्यावेळी ६५ के .व्ही .चे जनरेटर खरेदी केले होते

.विज गेल्यानंतर या जनरेटच्या आधारावरच धरणाचे काम सुद्धा पुर्ण झाले .धरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर मात्र हे जनरेटर प्रकल्पाच्याच घाटघर येथील कोकणकड्यावर असणा-या एका शेडमध्ये बंद अवस्थेत ठेवले गेले . ते बरेच वर्ष म्हणजे १ ऑगस्ट २०२२ पर्यंत त्याच अवस्थेत ठेवले गेलेले असताना २ ऑगस्ट रोजी मात्र हे अवाढव्य जनरेटर चोरीला गेल्याचे तेथील कर्मचा-यांच्या निदर्शनास आले .

चोरीचा फक्त साधा तक्रार अर्ज एका कर्मचा-याने राजुर पोलिस स्टेशनला तब्बल चोरी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी सादर केला होता . चोरीची रितसर फिर्याद देण्यासाठी राजुर पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी धरण शाखेच्या वरिष्ठ अधिका-यांनी तक्रार दाखल करणे अनिवार्य असल्याचे सांगत चोरीची तक्रार कर्मचा-याकडुन दाखल करुन घेतली नव्हती .
घाटघर जलविद्युत प्रकल्पाचे भंडारदरा येथील कायमस्वरुपी असणा-या अधिका-यांची एप्रिलमध्येच बढती झाल्याने ते नासिक येथे हजर झाले तर त्यांचा अधिकार ठाणे येथील एका वरिष्ठ अधिका-यांकडे देण्यात आला . पंरतु घाटघर येथील उंदचन प्रकल्पाचा कारभार या अगोदर नासिक येथे असणा-या अधिका-यांनीच बघावा असा तोंडी आदेश वरिष्ठ कार्यालयाडुन देण्यात आल्याची माहीती उपलब्ध होत आहे . त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या मते अगोदर असणा-या अधिका-यांनीच पोलिसात तक्रार दाखल करावी असे समजते .तर बढती झालेल्या अधिका-यांनी माझी एप्रिल मध्येच बदली झाली असल्या कारणाने मी पोलिसास्टेशनला तक्रार दाखल करु शकत नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले . त्यामुळे या चोरीस गेलेल्या जनरेटरची तक्रार पोलिसात कुणी दाखल करावयाची हा प्रश्न उपलब्ध झाल्याने आजपर्यंत कुणीच जनरेटर चोरीची तक्रार दाखल केलेली नाही .

त्यामुळे इतक्या मोठ्या जनरेटरची चोरी होऊन सुद्धा पोलिस स्टेशनला अधिकारी का तक्रार दाखल करत नाही ? कुणा कर्मचा-याला वरिष्ठ अधिकारी वाचविण्याचा प्रयत्न करताहेत का ? किंवा अधिका-यांचाच तर या चोरीशी काही थेट संबंध नाहीत ना ? दोन महिने जनरेटर चोरीला जाऊनही पोलिसात तक्रार का दाखल होत नाही .? कि नको उगिच बलामत म्हणुन चोरांनाच पाठीशी घालण्याचा तर हा प्रकार नाही ना ? असे अनेक तर्क वितर्क भंडारदरा परिसरातुन ऐकावयास मिळत आहे . या अगोरदही घाटघर उंदचन प्रकल्पाच्या परिसरात भंगार चोरी , पोल चोरी , विश्रामगृहाचे साहीत्य चोरीस गेलेले आहेत . त्या चो-या जशा पचल्या गेल्या अगदी त्याच पद्धतीने हे ६५ के .व्ही जनरेटर गडप होण्याच्या तयारीत दिसत आहे . त्यामुळे घाटघर येथील जनरेटर चोरीचे प्रकरण नक्कीच गुलदस्त्यात असल्याचे जाणवत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button