
कोतुळ दि १९
पिंपळगाव खांड येथील आदिवासी कुटुंबियांचे वीज वितरण कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन सुरू केले
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड (कातर माळवाडी) येथील आदिवासीवाडी तील 20 कुटुंबांना 42 विद्युत पोल विद्युतीकरणासाठी मंजूर झाले मात्र गेल्या अनेक वर्षापासून या वाडीतील लोक पोलची मागणी करत आहेत याची अनेक वेळा मागणी करूनही वीज वितरण त्याची दखल घेत नाही येणारी दिवाळी अंधारात जाणार आहे यामुळे आज माकपच्या नेतृत्वाखाली येथील आदिवासी कुटुंबियांनी कोतूळ वीज उपकेंद्र कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले

जोपर्यंत आम्हाला विद्युत पोल मिळत नाही आमच्या घरात विजेचा दिवा लागत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या कार्यालयातून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आमची दिवाळी याच कार्यालयात साजरी करू असा इशारा आंदोलकांनी देत आपले ठिय्या आंदोलन सुरु केले आहे

कोतूळ ग्रामपंचायत कार्यालयापासून पायी जात जात घोषणा देत येथील शाखा अभियंता श्री कळभे यांना निवेदन देऊन दिले त्यानंतर या आदिवासी कुटुंबांनी वीज उपकेंद्रावर कोतुळ येथील वीज वितरण च्या कार्यालयात हे आंदोलन सुरु केले
हे आंदोलन आज सकाळपासून सुरू केले आहे माकपचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सदाशिव साबळे, रवींद्र आरोटे ,कॉम्रेड नामदेव भांगरे, कॉम्रेड निवृत्ती डोके ,नाथा जाधव, कॉम्रेड रावजी पारधी, रामनाथ मधे गावजी भूतांबरे , एकनाथ गिर्हे, सरपंच विजय जगताप संतोष शेटे,सागर शेटे आदींनी या आंदोलनात भाग घेतला आहे