इतर
विखे यांच्या मदतीने संगमनेरात नुकसानग्रस्तांना शासकीय मदत!
संगमनेर प्रतिनिधी
जून महीन्यात वादळी वाऱ्याने संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.होते या नुकसानी बाबत माजी मंत्रीआ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा करून १७ नूकसानग्रस्त ग्रामस्थांना शासनाकडून मदत मिळवून दिली.
या मदतीच्या धनादेशाचे वाटप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी विजयराव डेंगळे, इंद्रभान तांबे,लक्ष्मण तांबे, भरत तळोले ,सौ.लक्ष्मीबाई वाकचौरे, सौ.पद्मा डोळे , सौ.मनीषा वदक,मंडल अधिकारी सौ.चतुरे, तलाठी चिंचोलकर उपस्थित होते.