ई-पीक पाहणी रद्द करून ८ अ प्रमाणे पीक पाहणी करा; महसूल मंत्र्यांचे आदेश

पारनेर तालुक्यात मंत्री विखेनी केली नुकसानग्रस्त भागाची पहाणी
दत्ता ठुबे पारनेर/प्रतिनिधी :
राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी सुजित झावरे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना सरसकट ८ अ पीक पाहणी करण्यात यावी जेणे करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना लाभ मिळेल. असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशास आणून दिले. यावेळी मंत्री विखे यांनी लगेच ई-पीक पाहणी रद्द करून ८ अ प्रमाणे पीक पाहणीचे आदेश दिले.

यावेळी पारनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर सत्कार करताना माजी जि.प. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी माने, राहुल शिंदे पाटील, सचिन वराळ, विश्वनाथ कोरडे, भास्कर शिरोळे, शिवाजी खिलारी, बाळासाहेब पठारे पाटील, सागर मैड, किरण कोकाटे, किसन धुमाळ, अरुणराव ठाणगे, युवराज पठारे पाटील, पंकज कारखिले, कैलास कोठावळे, विश्वनाथ झंझाड, तुषार पवार, नुकसानग्रस्त शेतकरी वर्ग, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
