मातृ पितृ कृतज्ञता सोहळा करणारे इंदुरीकर हे राज्यात एकमेव कीर्तनकार – डॉ. सुजय विखे पाटील

अकोले / प्रतिनिधी
आई वडिलांची सेवा करा असे कीर्तनातून फक्त प्रबोधन न करता मातृ पितृ कृतज्ञता सोहळा आयोजित करणारे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार आहेत असे गौरवोदगार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
इंदुरी येथे समाज प्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख व शालिनीताई देशमुख यांच्या वतीने आयोजित मातृ पितृ अखंड हरिनाम सप्ताह मध्ये डॉ विखे पाटील बोलत होते. यावेळी संगमनेर चे आमदार अमोल खताळ पाटील, पांडुरंग महाराज गिरी गगनगिरी प्रतिष्ठाण चे दिलीप शिंदे, विखे पाटील फाउंडेशन चे विकास वाकचौरे, भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, निळवंडे च्या सरपंच सौ. शशिकला पवार, निलेश गायकर, नरेंद्र नवले, प्रकाश पाचपुते आदी उपस्थित होते.

डॉ विखे पाटील म्हणाले की, वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून ती विखे पाटील परिवाराकडून जपली जाते, यासाठी इंदुरीकर महाराज यांचे मोठे योगदान आहे. कीर्तनातून दुसऱ्याला फक्त न शिकवता तसे वागण्याचे काम महाराज करित आहे. यातून प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
आमदार अमोल खताळ यांनी धर्म रक्षणासाठी चे कार्य वारकरी संप्रदाय करित आहे पण मी धार्मिक व्यासपीठावर प्रथमच बोलत आहे. इंदुरीकर महाराज यांचे कार्य देशभर आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशश्वीतेसाठी कृष्णा महाराज देशमुख, किरण महाराज शेटे, नारायण महाराज थोरात, ज्ञानेश्वरी देशमुख, माऊली आरोटे, यांनी प्रयत्न केले.
यावेळी डॉ सुजय दादा विखे पाटील यांचा वारकरी फेटा बांधून बुका राधे राधे ची शाल देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. विखे पाटील व आमदार खताळ यांनी इंदुरीकर महाराज व शालिनीताई देशमुख यांचा सपत्नीक हार व शाल घालून सन्मान केला.