इतर

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करा , विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

सध्या राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे अशी मागणी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांनी केली.

पिंपरी जलसेन येथे झालेल्या नुकसानीची औटी यांनी पाहणी करत महिती घेतली.
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे नूतनीकरण विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या हस्ते करण्यात आले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा औटी यांनी जाणून घेतल्या.

यावेळी कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, नगरसेवक राजू शेख, शिवसेना तालुका संघटक अमोल गजरे शहर प्रमुख निलेश खोडदे, नगरसेवक कांतीलाल ठाणगे, नगरसेवक देवराम ठुबे, गट प्रमुख बाबासाहेब रेपाळे, शुभम पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना औटी म्हणाले की, दिवाळी सणाच्या तोंडावर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतीमालाचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. शासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी राजा हताश असताना मी शाखेच्या नूतनिप्रसंगी सन्मान स्वीकारू शकत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करून घ्या. असा सल्लाही औटी यांनी यांना शेतकऱ्यांना दिला. याच बरोबर पिंपरी जलसेनचे सुपुत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष व जी एस महानगर बँकेचे चेअरमन ऍड उदयराव शेळके यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी करत गावचा सुपुत्र आजारी असताना मी त्यांच्या गावात येऊन सत्कार घेणे उचित नाही.असे म्हणत सत्कार नाकारत मी व माझे सहकारी याठिकाणी राजकीय भाषण करणार नाही. उदयराव शेळके बरे होऊन आल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा त्यांची भेट घेण्यासाठी पिंपरी मध्ये येऊ असेही विजयराव औटी म्हणाले.
यावेळी पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, शिवसेना शाखाप्रमुख जगदीश सोनवणे, उपशाखाप्रमुख सईद शेख, बाळासाहेब वाढवणे, दगडू थोरात, अश्रफ शेख, राजू दादा काळे, दत्ता थोरात, ग्रा प सदस्य संतोष थोरात, तुषार काळे, भास्कर काळे, आप्पासाहेब कदम, पोपट थोरात, शिवाजी बोरूडे, आदिनाथ कदम, दिलीप बोरूडे, संदीप वाढवणे, अक्षय बोरूडे, धनाजी थोरात, ज्ञानदेव वाढवणे, संतोष कदम, माऊली थोरात, शिवाजी बोरूडे, पोपट अडसरे, कोंडीभाऊ बोरूडे, राजेंद्र थोरात, रमेश कदम, हुसेन शेख, भानुदास थोरात, बाबाजी वाढवणे, मच्छिंद्र कदम, सर्जेराव कदम आदींसह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ शिवसैनकांची चौकशी….
जेष्ठ शिवसैनिक बबन घेमुड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी इतर मान्यवरांनी घरी जाऊन भेट घेतली. “तुम्ही आजारातून लवकर बरे व्हा, संघटनेला तुमची गरज आहे. आपल्याला हे सर्व नव्याने उभे करायचे आहे” असे औटी यांनी म्हणताच “मला पण खूप तळमळ आहे, लवकरच मी पण आजारातून बरा होईल. तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला भेट दिल्याने मला ऊर्जा मिळाली असून मी लवकर बरा होईल असे जेष्ठ शिवसैनिक बबन घेमुड म्हणाले
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button