स्वाभिमानी मराठा महासंघ अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भुसे यांची निवड !

अहमदनगर दि२८
स्वाभिमानी मराठा महासंघ ही संघटना मराठा समाजाचे नेतृत्व करणारी तर आहेच शिवाय सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन कार्य करणारी ही संघटना आहे मुख्य म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हीरीरीने झटणारी व शेतकरी वर्गाचे प्रश्न शासन दरबारी सांगुन न्याय मिळवून देणारी संघटना आहे व या संघटनेने कमी वेळात महाराष्ट्र राज्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला समाजातील तळागाळातील कुठलाही गोरगरीब असो त्याला माहीत आहे आपल्या वरील संकट दूर करण्यासाठी ही संघटना मदत करणार आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेची वेळोवेळी बांधनी केली जाते नुकतेच अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भुसे यांची निवड झाली निवडीचे पत्र देताना संस्थापक अध्यक्ष डॉ कृषीराज टकले ,जिल्हाध्यक्ष अंकुश डाभे ,तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे ,अकोलकर सर ,श्रीराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते