फराळ आणि कपड्यांचे वाटप करत उरण सामाजिक संस्थेने साजरी केली दिवाळी !

हेमंत सुरेश देशमुख
प्रतिनिधी /उरण रायगड
उरण सामाजिक संस्थेच्या वतीने
उरण तालुक्यातील विंधनें कातकरी वाडीत आदिवासी लोकांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली
उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, कार्याध्यक्ष दिनेश घरत , भरत मढवी, उपाध्यक्ष प्रा राजेंद्र मढवी, अरविंद घरत, श्री आणि सौ प्रशांत पाटील, श्री आणि सौ वैभव पाटील, सुरेंद्र पाटील, अंकुश तांडेल, वर्षा ठाकूर, ॲड शेखर पाटील, दिलीप पाटील, सुधर्म घरत, नामदेव ठाकूर, शशिकला घरत, संजय पवार , हर्षवर्धन पवार , रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी शक्य असेल तो फराळ जमा केला. त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून सर्व आदिवासी लोकांना वाटले.
सदर पूर्ण नियोजन सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी केले. Ongc चे माजी युनियन लिडर श्री अरविंद घरत यांनी वाडी वरील शाळेचे नूतनीकरण आणि डिजिटल शाळा असे दोन प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत असे सांगितले. सर्व मुलांनी व्यवस्थित पने अभ्यास करून यशस्वी व्हावे अशी सूचना अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केली.