राजापूरच्या नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमनेर-तालुक्यातील राजापूर येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १ जुलै २०२४ रोजी ११ वी कला,वाणिज्य व विज्ञान शाखेत नवीन ऍडमिशन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री आर.पी. हासे, स्कूल कमिटी चेअरमन श्री भाऊसाहेब हासे , संचालक रंगनाथ खतोडे, संचालक माननीय श्री. मुरली अण्णा हासे .या सह त्यांसमवेत विद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक पथवे सर ज्युनियर कॉलेज इन्चार्ज प्रा.देशमुख सर इतर सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक देशमुख सर, श्री भाऊसाहेब हासे श्री आर .पी . हासे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची आणि त्यांच्या योगदानाची परतफेड कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले
.तसेच बारावी सायन्स नंतर किंवा बारावीनंतर आपल्याला भविष्यात कोणत्या ठिकाणी स्कोप आहे कुठे ऍडमिशन घेऊ शकतो तसेच इतर सर्व शैक्षणिक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता हासे मॅडम यांनी केले तसेच आभार प्रा.पोकळे सर यांनी केले
