म्हसे खुर्द येथे कुकडी नदीत पाय घसरून अक्षय गायकवाड हा बालक बेपत्ता !

!
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
गेल्या आठवड्यात पारनेर तालुक्यात व परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे नदीपात्राच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऐन दिवाळीच्या कालावधीमध्ये अनेक रस्त्यांचे व वाडी-वस्तीवर जाण्याचे मार्ग उध्वस्त झाले आहेत शेती पिकाचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यावर्षीची दिवाळी ही शेतकरी बांधवांना दुःखात व क्लेशदायक वातावरणात साजरी करावी लागली आहे.
मंगळवारी म्हसे खुर्द येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत चि.अक्षय राजेंद्र गायकवाड या बालकाचा कुकडी नदीच्या प्रवाहात पाय घसरून पडून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहत जाऊन तो बेपत्ता झाला . त्याचा शोध घेण्यासाठी स्वतः आमदार निलेशजी लंके यांनी घटनास्थळी तात्काळ जात घटनास्थळाची पाहणी केली व कुमार अक्षय गायकवाड यांच्या कुटुंबाची समजूत काढली .सकाळी नऊ वाजता कुकडी नदीच्या काठावर अक्षय व त्याचे आई-वडील गेले असताना अक्षयचा पाय घसरून तो पाण्यात पडला त्यानंतर अक्षयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ग्रामस्थांना व तरूण मित्रांना त्याचा शोध लागला नाही . मग गावातील महेंद्र रासकर, अनिल मदगे यांनी मा.सभापती सुदामराव पवार यांच्याशी संपर्क साधल्या नंतर सभापतींनी आमदार निलेशजी लंके व शिरूरचे आमदार अशोकबापू पवार यांच्याशी संपर्क साधला. व सर्व अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने घटनास्थळी पाठवले . त्यानंतर शोध कार्यासाठी लागणारी यंत्रणा निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचविण्यास मदत केली.मुलाला शोधण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.या घटनेने म्हसे खुर्द गावातील ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे !
सदर घटनेबाबत मा.आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी अहमदनगर,निवासी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना फोन करून सदर घटनेची माहिती देऊन त्या ठिकाणी NDRF टीमला पाचारण करण्यात आले .
मंगळवारी सायंकाळी सदर ठिकाणी NDRF टीम दाखल होऊन आज सकाळ पासून शोध मोहीम सुरू झाली .कुमार अक्षय गायकवाड याचा शोध लागावा म्हणून म्हसे खुर्द,कोहकडी व आजूबाजूच्या गावातील तरुण सहकारी व ग्रामस्थ या शोध मोहिमेत सामील होऊन तपास कार्यात मदत करत आहेत .