जुन्नर चे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचे हस्ते भोजनेवाडी येथे संविधान भवन चे भूमिपूजन!

कोतुळ दि 10
जुन्नर चे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचे हस्ते अबीतखिंड (भोजनेवाडी) ता अकोले येथे संविधान सांस्कृतिक भवन चे भूमिपूजन करण्यात आले
आदर्श माता कै. बुधाबाई नामदेव भोजने
यांच्या स्मृती दिनी शनिवार दि ७ जानेवारी २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संविधान भवन या नियोजित इमारतीचे भूमिपूजन जुन्नर चे माजी आमदार बाळासाहेब दांगट , ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी) यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले

यावेळी अबिटखिंड, भोजनेवाडी,ता. अकोले, जि. अहमदनगर येथे मातोश्री बुधाबाई भोजने यांच्या स्मृती दिना निमित्ताने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा माजी आमदार बाळासाहेब दांगट व ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे , संविधान सैनिक संघ, चे संस्थापक अध्यक्ष डॉ रवींद्र जाधव यांचे हस्ते जीवन गौरव”, “आदिवासी भूषण”, “संविधान गौरव” अशा विविध पुरस्कारांने मान्यवरांना गौरविण्यात आले.
लोकशाहीर भीमराव ठोंगिरे ,लेखक साहित्यिक शरद ताजने ,तान्हाजी कर्पे, डॉ एस के सोमण, डॉ सुरेखा जाधव, सुवर्णाताई ठाकरे, संगीता साबळे, राजू जगधने, दिगंबर नवाळे,बोटे सर आदींना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
तरुण पिढीचे वैचारिक प्रबोधन व्हावे या साठी ग्रामीण भागात संविधान विचार पोहचविण्यासाठी आदिवासी भागात संविधान साहित्य संस्कृती संग्रहालय ही एक आज काळाची गरज असून नव्या पिढीला वाचन संस्कृती समजावी आणि त्यातून वैचारिक क्रांती घडावी या उद्देशाने भोजनेवाडी येथे संस्कृतिक भवन साकारणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजन रामनाथ भोजने यांनी यावेळी सांगितले

यावेळी , वसंत पिचड (विक्रीकरआयुक्त ,मुंबई),तानाजी कर्पे (आम्ही नगरकर ग्रुप, प्रेरणा प्रतिष्ठान अध्यक्ष), राजू पाटील-देशमुख (मा.सरपंच, कोतुळ), ऍड.राजाराम बेंडकोळी,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खरे , धोंडिभाऊ पानसरे ,विनायक कदम, दिगंबर नवाळे, प्रकाश वैराळ, मधुकर जगधने, भाऊसाहेब जगधने, किशोर रावराणे मुंबई , ग्रामस्थ लक्ष्मण भोजने, सचिन आढारी, भिवा भांडकोळी,यमुनाबाई घनकुटे (सरपंच, अबिटखिंड) भानुदास गोडे (मा.सरपंच, अबिटखिंड),आदी मान्यवर उपस्थित होते
सूत्रसंचालन भीमराव ठोंगिरे यांनी केले आभार अभिषेक भोजने यांनी केले. आम्ही नगरकर या दिनदर्शिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले
