राज्यात यलो अलर्ट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, कोकणात धोक्याचा इशारा
मुंबई : झारखंडच्या ईशान्य बाजूपासून ते तमिळनाडू पर्यंत असलेली वाऱ्याची खंडितता किंवा कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडू पर्यंत जात आहे. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरामधून मॉइश्चर इन्फेक्शन देखील होत असल्यामुळे हवामान दमट झाले आहेत. यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट पुणे हवामान विभागाने जारी केला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात आजही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी राज्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुणे, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यावर काल पासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी गरपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहील अशी शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली येथे बुधवारी आणि काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतर गुरुवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचे सातत्य कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे मंगळवारपासून तर वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती आणि अकोला येथे बुधवार आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतरही मेघगर्जनेसह पाऊस कोसळू शकतो.
कोकण गोव्यामध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या हवामान कोरडे राहील राहण्याची शक्यता आहे. १८ ते २० एप्रिल पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये १६ ते १७ एप्रिल हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर १८ ते २० एप्रिल पर्यंत हवा कोरडी राहणार असल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात १६ ते १९ एप्रिल आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगळा राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना व विजांचा कडकडात देखील होण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० एप्रिलला मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगा राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ व २२ एप्रिलला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील वारा खंडितता प्रणाली जोवर कायम राहील तोवर महाराष्ट्रातील अवकाळीची स्थिती निवळण्याची शक्यता नाही, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
कोकण विभागासाठी पुढील चार पाच तास धोक्याचे
कोकणासाठी पुढील चार ते पाच तास अतिशय महत्वाचे आहे. या काळात शक्यतोवर बाहेर पडने टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ येईल. तर यावेळी ताशी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढील ३-४ तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असेही करण्यात आल आहे.
बाहेर पडतांना ही काळजी घ्या
मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना त्या सूचना पाळाव्यात कडकडाट होत असताना झाडाखाली उभे राहू नये तसेच विजा चमकत असताना मोबाईलचा वापर पण करू नये. इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील वापरू नये. जोरदार वारा असेल तेव्हा खिडकी आणि दरवाजे बंद कराव्यात. जोरदार वारा किंवा विजांच्या टाळ्यात प्रवास शक्यतो टाळावा. सावकाश आणि सुरक्षित वाहने चालवा कारण दृश्य मान्यता कमी होऊ शकते व त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ शकतात. जोरदार वारा असेल तेव्हा गच्ची किंवा गॅलरीच्या कठड्यावर कुंड्या किंवा जड वस्तू वगैरे ठेवू नयेत. तसेच दमट हवेमुळे अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी असे देखील हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.