मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्यां सोडवा

वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालकांची सदिच्छा भेट
छत्रपती संभाजीनगर- सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक मा.राहुलजी गुप्ता यांची सदिच्छा भेट घेऊन मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या विविध समस्यां सोडवा, कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर करा अशी मागणी करण्यात आली
. वेळेत हजेरी पत्रक न देणे,वेतन चिट्ठी न देणे, किमान वेतन कायद्यानुसार पूर्ण वेतन व पगार वाढीच्या फरकाची रक्कम पूर्ण न देता संगनमताने विविध शासकीय संविधानिक देय रकमेवर डल्ला मारणे, तक्रारदार कामगारांना आकसाने कामावरुन कमी करणे, मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे, कोर्ट केसच्या मधील कामगारांना आकसाने कमी करणे इत्यादी समस्यां या यावेळी संघटनेने मांडल्या
याबाबत लवकरच सर्व उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, अधीक्षक अभियंता व मानव संसाधन अधिकारी यांचे समक्ष मीटिंग घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या शिष्टमंडळात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उप सरचिटणीस राहुल बोडके, केंद्रीय संघटन मंत्री तात्यासो सावंत, अशोक खंडागळे, पांडुरंग खेडेकर,नरेंद्र दिनकर, बालाजी नांदूरकर ज्ञानेश्वर वाघ, जितेंद्र बिराजदार, रमेश बेढे, परमेश्वर गाडेकर, आदिनाथ पडुळ, संतोष गायकवाड,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.