इतर

दगडवाडी, खांडगाव, निंबळक ,
टाकळीकाझी येथे सेवा केलेल्या
ग्रामसेवकाचा घात की अपघात?

पाथर्डी प्रतिनिधी : –

मोटारसायकल अपघातात करंजी येथील रहिवासी ग्रामसेवक अनिल भाकरे यांचे पुणे येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. मात्र हा अपघात की घातपात याविषयी नागरिकात उलट-सुलट चर्चा चालु आहे.

सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता अनिल शिवाजी भाकरे (वय ३६वर्ष) घरातून बाहेर पडले होते. काम आटोपल्यानंतर अनिल शिवाजी भाकरे हे रात्री ११ च्या दरम्यान घराकडे येत असताना करंजी बस स्टॅण्डच्या जवळ हाकेच्या अंतरावर ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले असल्याची खबर एका वाहन चालकाने करंजी बसस्थानकावर येवुन दिली. खबर मिळताच त्यांचे अनेक मित्र तेथे जमा झाले आणि त्यांना तातडीने नगरच्या खाजगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु अनिल भाकरे हे गंभीर जखमी असल्याने काल दुपारी त्यांना पुण्याला हलविले होते. आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या अपघातात त्यांच्या मोटारसायकलला फक्त किरकोळ नुकसान झाले आहे.वाहनाच्या धडकेने मोठे नुकसान झाले असते, आणि त्याचा आवाजही बस स्टॅण्डवर गेला असता.परंतु मोटार सायकलचे अतिशय किरकोळ नुकसान झाल्याने नागरिकातुन संशय व्यक्त केला जात असुन हा नेमका अपघात आहे की, घातपात आहे याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. अनिल भाकरे यांनी दगडवाडी, खांडगाव, निंबळक येथे काम केले आणि आता टाकळीकाझी येथे ग्रामसेवक म्हणुन ते काम पहात होते. करंजीचे माजी सरपंच शिवाजी भाकरे यांचे ते चिरंजीव होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरातील अनेक चाहत्यांनी त्यांच्या करंजी येथील निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या मित्र परिवारात व कंरजी परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button