इतर
पनवेल बसस्थानका साठी लाक्षणिक धरणे आंदोलन

हेमंत सुरेश देशमुख
रायगड प्रतिनिधी
पनवेल बसस्थानकाचा वनवास संपेना !
पनवेल प्रवासी संघा च्या वतीने अभिजित पाटील, भक्तीकुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली "प्रस्तावित पनवेल बस स्टॅन्ड सुसज्ज पद्धतीने आणि लवकरात लवकर व्हावे" यासाठी आज लाक्षणिक धरणे आंदोलन। करण्यात आले या धरणे आंदोलनात मा.आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी पनवेल बस स्टॅन्ड येथे धरणे आंदोलन स्थळी उपस्थित राहून आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
पनवेल हे कोकण सह अखंड महाराष्ट्राचे प्रवेशद्वार मानले जाते आणि या प्रवेश द्वारावरील बस स्थानकाची दयनीय अवस्था आहे .14 वर्ष झाली तरी सोई सुविधा अभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने प्रवाशी वर्गाचा विचार करुंन यावर वेळीच उपाय योजना करून लवकरात लवकर हे बस स्थानक करावे अशी मागणी करण्यात आली अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून मा आमदार.मनोहरशेठ भोईर यांनी दिला.
यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, पनवेल प्रवासी संघ, शेकडो प्रवासी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
