देवदर्शनाला जाते असे सांगून घरातून गेलेली केडगाव मधील वृध्द महिला बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या दर्शनास जाते असे सांगून घराच्या बाहेर गेलेली 62 वर्षी वृद्ध महिला अद्याप घरी परतली नाही ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव येथील मोहिनी नगर येथे घडली
याबाबतची माहिती अशी की इंदुबाई भास्कर परांडे ( वय 62 वर्षे, रा. मोहिनी नगर, केडगाव,अ.नगर ) या दिनांक 10 मार्च 2022 रोजी घरात मी पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या दर्शनाला जात आहे असे सांगून घराबाहेर गेले ते अद्यापही नाही तिच्या घरच्यांनी तिचा शोध सर्वत्र घेतला. त्यांचे नातेवाईक, गावी, नगर शहरात कोठेही ती मिळून आली नाही. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील शेखर परांडे, ( वय-30 वर्ष, रा. मोहिनी नगर, केडगाव, अ.नगर ) यांनी दिलेल्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी मिसिंग नोंद दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक खोमणे करीत आहे.
हरवलेल्या महिलेचे वर्णन
नाव इंदुबाई भास्कर परांडे, वय 62 वर्षे, उंची 55 फुट, रंग गोरा, शरीर बाधा मध्यम, केस- अर्धवट लाल व पांढरे वारीक, चेहरा, गोल, पेहराव, पांढरे रंगाची सहावारी साडी त्यावर
लाल फुलांचे डिझाईन व सोबत कापडी पिशवी, तीमध्ये विविध साहित्य असे आहे. या वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास अगर तिच्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे फोन नंबर 0241 24 16 117 या फोनवर संपर्क करावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.