नगर-पुणे महामार्गावर सुप्याजवळ अपघातात १३ प्रवासी गंभीर जखमी

दत्ताठुबे/पारनेर प्रतिनिधी :
नगर-पुणे महामार्गावरील वाघुंडे खुर्द गावच्या चौकात राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस कंटेनरला पाठीमागच्या बाजूने धडकली. हा अपघात गुरुवारी (दि.३) दुपारी तीनच्या सुमारास झाला. एसटीतील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघुंडे खुर्दचे माजी सरपंच संदीप मगर, वाघुंडे बुद्रुकचे सरपंच संदीप वाघमारे यांच्यासह तरुणांनी प्रयत्न केले. दुपारी तीन वाजता वाघोली येथे माल घेऊन जाणारा कंटेनर वाघुंडे खुर्द शिवारात आला होता. त्याचवेळी अंमळनेर-पुणे ही एसटी बस चालली होती. एसटी बस पाठीमागून जोराने कंटेनरला धडकली. त्यामुळे बसमधील १३ प्रवासी जखमी झाले.
गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेस संपर्क तातडीने करून अपघाताची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात नेले. बसमधील जखमी प्रवासी १)मिताली देवकांत पाटील, २)हेमांगी देवकांत पाटील, ३)प्रेरणा निवृत्ती सोनावणे (सर्व रा. अंमळनेर, जि. जळगाव), ४)अमोल रतीलाल भांबरे (रा. वासमार, ता. साक्री, धुळे), ५)अंजना निवृत्ती पवार (रा. मालेगाव, नाशिक), ६)जिजाबाई पोपट पाटील (रा. धामणगाव धुळे), ७)मंगल देवराम वाघमोडे (रा. राहुरी, नगर), ८)रुपाली संजय दाळवे (रा. अंमळनेर, जळगाव), ९)नवनीत सुखलाल करंदीकर, १०)धीरज नवनीत करंदीकर, ११)मनीषा नवनीत करंदीकर (सर्वजण रा. धायरी, पुणे), १२)प्रतिभा बाबासाहेब बनकर (रा. राहता, नगर), १३)प्रणव संजय दाळवे (रा. अंमळनेर, जळगाव).