हवाई दलात अग्निवीर वायू पदांसाठी भरती, ७ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया
औरंगाबाद।
हवाई दलामध्ये अग्निवीर वायूच्या ३५०० पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार http://agnipathvayu. cdac.in/ वर ७ ते २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. बारावी किंवा समकक्ष अशी शैक्षणिक पात्रता आहे. वयोमर्यादा २१ वर्ष पर्यंत आहे. ही चार वर्षांसाठी सेवारत पदे आहेत. पहिल्या वर्षी ३० हजार, दुसऱ्या वर्षी ३३ हजार, तिसऱ्या वर्षी ३६ हजार ५०० तर चौथ्या वर्षी ४० हजार रुपये प्रति महिना वेतन आहे. चार वर्षानंतर सेवा पूर्ण झाल्यावर सेवा निधी पॅकेज म्हणून ११ लाख ७१ हजार इतकी रक्कम मिळेल.
कृषी वैज्ञानिक चयन मंडळात ३४९ जागा, ११ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
औरंगाबाद । कृषी अनुसंधान आणि शिक्षण विभागाच्या वतीने देशभरातील आयसीएआरच्या रिजनल स्टेशन व केंद्र येथे ३४९ पदांसाठी भरती होत आहे. यात हेड ऑफ डिव्हिजन आणि सीनियर सायंटिस्ट ही पदे भरण्यात येतील. यासाठी उमेदवार ७ नोव्हेंबरपर्यंत asrb.org.in asrb. org. in
या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतील, तर सीनियर सायंटिस्ट या पदासाठी अर्ज करण्याची मुदत ११ नोव्हेंबर आहे.