उद्धव ठाकरे सेनेचा संगमनेरात अंतर्गत वाद चव्हाट्यावर ! खेवरेंचा पुतळा जाळला!

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
आज संगमनेर तालुक्यातील व शहरातील शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे यांचा पुतळा जाळला
गेल्या चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना या मुखपत्रातून शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली होती त्या कार्यकारणीस स्थगिती देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खेवरे यांचा जाहीर निषेध व नेहमीप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पै खेवरे यांच्या मनासारखे झाले नसल्याने त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील ज्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळाले नाही त्यांची माथी भडकवण्याचे काम केले व त्यांना सदर निर्णयाविरोधात नियुक्ती विरोधात आंदोलन करण्यास सांगितले पै खेवरे यांच्या सांगण्यावरून उत्तर नगर जिल्ह्यात काही शिवसैनिकांनी आंदोलन केले व शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या पुतळ्याला जोडमार आंदोलन केले या घटनेचा निषेध करण्यासाठी व आपला रोष व्यक्त करण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या मागणीनुसार पै रावसाहेब खेवरे हटाव उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेना बचाव हे आंदोलन करण्यात आले
उत्तर नगर जिल्हा प्रमुख पै रावसाहेब खेवरे विखेंचे पंटर!
स्वतःच्या तालुक्यात एकही पंचायत समिती सदस्य नाही एकही जिल्हा परिषद सदस्य नाही स्वतःच्या राहुरी व देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये दोन नगरपरिषदेपैकी एकही नगरसेवक नाही प्रत्येक वेळी सेटलमेंट करून शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे विखेचे पंटर असलेले उत्तर नगर जिल्हा प्रमुख पै रावसाहेब खेवरे यांच्या विरोधात संगमनेरात आंदोलन झाले सदर आंदोलनात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली व खेवरे हटाव शिवसेना बचाव अशा घोषणा देखील देण्यात आल्या तसेच पै रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला