इतर

कांद्याचे नुकसान पाहून शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळले !

अकोले प्रतिनिधी

मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला आज ना उद्या चांगला भाव येईल अशी भाबडी आशा उराशी बाळगत साठवलेला कांदा डोळ्या समोर सडला हे पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले!

चांगल्या भावाची वाट पाहत असतान। बाजार भावा ची निराशा झाली चांगला भाव मिळेल ही आशा ठेवली मात्र त्याच्या पदरी निराशा पडली साठवलेला कांदा देखील चाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर सडला त्याने दुसऱ्याचे शेतात वाट्या ने शेती केळी कांदा पिकवला मात्र अपेक्षित पैसे त्यातून कसे मिळेल आणि लोकांची देणे कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने कांदा चाळीतच गळफास घेत मृत्यूला जवळ केले आज रविवारी 12 वाजनेचे सुमारास ही घटना घडली
परशुराम पोपट पापळ (24 वर्ष) राहणार धामणगाव आवारी असे या मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे
धामणगाव आवारी येथील या शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा चाळीतच गळफास घेतला आणि जीवन यात्रा संपवली शेतकऱ्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात खळबळ उडाली आहे अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले अकोले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अकस्मात घटनेची नोंद केली आहे सायंकाळी धामणगाव आवारी येथे त्यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button