विश्वहिंदू परीषदेच्या हितचिंतक अभियानास पारनेर येथे प्रारंभ.

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
–राष्ट्रधर्म,संस्कृतीच्या रक्षणार्थ या विश्व हिंदू परिषद बजरंग दलामध्ये सामील व्हावे.विश्व हिंदू परिषद बजरंग दल हितचिंतक(सदस्यता नोंदणी)अभियान तीन वर्षातून एकदा विश्व हिंदू परिषद बजरंग दल सदस्यता नोंदणी अभियान चालवते.यावर्षी हे अभियान पारनेर मध्ये दिनांक ०६ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. घरो घरी जाऊन संपूर्ण हिंदू समाजाला जोडायचं काम होणार आहे.समस्त हिंदु समाजाने अभियानामध्ये सहभागी होऊन विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक होऊन धर्म कार्याला बळ द्यावे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री सचिन शेळके यांनी केले. पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील श्री क्षेत्र चुंभळेश्वर देवस्थान येथे महादेव मंदिर येथे पुजा महाआरती करून विश्वहिंदु परीषदेचे हितचिंतक अभियान सुरूवात करण्यात आली.यावेळी देवस्थानचे पुजारी हभप तोडकर महाराज यांच्या हस्ते पुस्तक पुजन करण्यात आले.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पारनेर प्रखंड मंत्री सचिन शेळके,मेजर रामदास जाधव,मेजर संतोष गाडीलकर, शिवाजी नवले,बाळु शेळके,चेतन राऊत,सुदाम शेळके,श्लोक नवले,वैभव पवार,पप्पू खोले, रोहीत शेळके,भैय्या शेळके,शुभम शेळके यावेळी उपस्थित होते. पारनेर येथील हितचिंतक अभियानासाठी नगर जिल्हा अभियान प्रमुख अमोल भांबरकर,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे यांनी मार्गदर्शन केले आहे.