शेवगाव तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने दिलेला आधार हे महत्वाचे सामाजिक पाऊल –आमदार मोनिका ताई राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
कोरोनाकाळात कुटुंबातील कर्तापुरुष गमावल्याने आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलेल्या महिलांना शेवगाव तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने दिलेला आधार हे महत्वाचे सामाजिक पाऊल असून प्रशासन आणि वैयक्तिक पातळीवर आपण या सामाजिक कामात संपूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार छगन वाघ होते.
शेवगाव तालुका एकल महिला पुनर्वसन समिती व स्टेट बँक स्टाफ सोसायटीच्या वतीने राज्य समनवयक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील दहा एकल महिलांना शिलाईयंत्र व पिकोफॉल यंत्रांचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गट, बालविकास अधिकारी भाऊसाहेब गडधे महेश फलके, नितीन मालानी, बापूसाहेब पाटेकर,सागर फडके, सुनील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री कारभारी गरड यांनी केले तर चंद्रकांत महाराज लबडे यांनी अध्यक्ष सूचना मांडली,उमेश घेवरीकर यांनी समितीची भूमिका मांडली. एकल समितीचे श्री अमोल घोलप, चंद्रकांत लबडे, देवा हुशार संदीप लांडगे मच्छीद्र भडके दिलीप कांबळे सचिन शिनगारे किरण भोकरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले सूत्र संचालन दीपक कुसळकर यांनी केले.