शिक्षणाच्या नवनविन वाटांचा विचार करावा लागेल-प्रा मिलिंद जोशी

संगमनेर- प्रतिनिधी
शिक्षण हेच परीवर्तनाचे साधन आहे.आपल्याला सामाजिक परीवर्तनाची वाट चालायची असेल तर शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करायला हवा.वर्तमानात पदवी देणे ही केवळ औपचारीकता उरली आहे.तरूणाईच्या हातात पदव्या आहेत म्हणून पोट भरता येईल अस होत नाही.या पदव्यांना देखील एक्सपायरी डेट छापावी लागेल अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे शिक्षणाच्या नवनविन वाटांचा विचार करावा लागणार आहे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलीद जोशी यांनी केले
ते चपराक प्रकाशनाच्या वतीन प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या पुस्तक प्रकाशन करताना बोलत होते.यावेळी प्रकाशन घनश्याम पाटील,मसापचे कार्यवाह प्रमोद आडकर, सातारा जिल्हा प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी पराडकर,मयुर बागुल. आदी उपस्थितीत होते.
प्रा.जोशी आपल्या भाषणात म्हणाले की,शिक्षणही गतीमान होते आहे.भविष्यात कोणते शिक्षण घ्यायचे आणि द्यायचे हे पालक व शिक्षकांना ठरवावे लागणार आहे.आज शिक्षणाचे सत्व हरवत चालले आहे.हे वास्तव समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शिक्षणात नेमके कशाची गरज आहे आणि शिक्षणातील सत्वाची वाट दाखविण्याचे काम संदीप वाकचौरे यांचे परीवर्तनाची वाट हे पुस्तक दाखवेल असे मत व्यक्त केले.
शिक्षण काळासोबत बदलते आहे त्याचा वेध घेण्याचे काम या पुस्तकातून घडले आहे.पुस्तकातील लेख छोटे छोटे असले तरी ते अत्यंत आशयघन आहेत.आज शिक्षणाविषयी गांभिर्यांने चर्चा करण्याची गरज आहे.तरूणाईच्या बळावर आज आपण महासत्तेचे स्वप्न पाहत आहोत ,पण शिक्षण जर त्या तरूणाईचे पोट भरू शकले नाही तर आक्रोश अधिक भयावह असेल.चिंतनाच्या वाटा दाखविणारे हे पुस्तक अधिक महत्वाचे आहे.आजच्या शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्वाची भूमिका बजावेल अशा विश्वास व्यक्त केला.घनश्यमाजी पाटील म्हणाले की,शिक्षण विषयक पुस्तकमाला आम्ही प्रकाशित करत आहोत त्यातील सहा पुस्तके प्रकाशित केली आहेत.येत्या काही दिवसात आणखी काही पुस्तके वाचकांच्या हाती दिले जातील.पुस्तकांना वाचकांचा प्रतिसाद अत्यंत उत्तम मिळत आहे.पुस्तक विषयी भूमिका संदीप वाकचौरे यांनी मांडली.उपस्थितांचे आभार मयूर बागूल यांनी मानले.