पारनेर मध्ये महावितरण चे दोन कर्मचारी अँटिकरप्शन च्या जाळ्यात !

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात निघोजला महावितरणचे ( MSEB ) दोन लाचखोर कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले
.या कर्मचाऱ्यांनी घरातील नादुरुस्त मिटर बदलून देण्यासाठी लाच मागीतली होती त्यानंतर तक्रारदाराने लाच देण्यास असमर्थता दर्शवित थेट निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेला संपर्क साधला
तक्रार दारा समवेत लोकजागृती च्या पदाधिकार्यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार नोंदवली त्यानंतर .
नगर लाचलुचपत प्रतिबंधक च्या पथकाने आज ही यशस्वी कारवाई केली आहे . लाचखोर कर्मचाऱ्यांना (आरोपींना) जवळा येथील पेट्रोल पंपावर लाच घेताना पकडले असुन नगरच्या अँटी करप्शन च्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे . आरोपींकडुन मुद्देमाल हस्तगत करून पंचनामा केल्यानंतर
पोलिस ठाण्यात सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .