अकोल्यातील कन्या विदयालयाच्या 14 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

अकोले / प्रतिनिधी
–महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कन्या विद्यालयाच्या 14 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले
. इयत्ता 5 वी व 8 वी ला प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अशा प्रकारची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करीत असते . मंगळवारी या परीक्षेचा अंतरिम निकाल लागला.त्यात कन्या विद्यालयातील इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती मधील सार्थक पाटोळे,अविष्कार नवले,संकेत भोजने ,श्रेयश दारोळे, अथर्व आवारी, आयुष आवारी,परशुराम कोरडे,प्रसन्न देशमुख, अभिजित वैद्य,अनन्या नवले,श्रुष्ठी मुठे,अमृता साबळे,काव्या मोहिते,अनुष्का आवारी
तर 8 वी तील विशाल आंबरे व पियुष शिंदे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना मंगल कर्पे, संजीवनी सहाणे, कल्पना मंडलिक,एन व्ही कोटकर,अमोल वैद्य,मोनाली पवार, अनिता बलसाने, ,पूजा गोसावी, अमृता थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख , खजिनदार धनंजय संत,स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्षा कल्पनाताई सुरपुरीया ,मुख्याध्यापक बी एच पळसकर सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .