अकोले- संगमनेर रोटरी क्लब चा पुढाकार बहिरवाडी शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब चे वाटप!

अकोले प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या टॅलेंट ला उभारी देण्यासाठी व तंत्रज्ञान युगासाठी त्यांचे ज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने अकोले रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील बहिरवाडी जि.प.प्रा.शाळेमधील 34 विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब चे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब च्या वतीने अकोले तालुक्यातील विविध जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना रुपये 11 लाख 60 हजार किमतीचे 79 शैक्षणिक टॅब चे वाटप करण्यात येणार असून त्यापैकी आज 34 टॅब चे विद्यार्थ्यांना वितरण केले आहे.
या टॅब वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक बाळचंद चासकर होते.रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष डॉ.रविंद्र डावरे,सेक्रेटरी सुनील नवले,माजी अध्यक्ष सचिन आवारी,सेक्रेटरी डॉ.सुरींदर वावळे, खजिनदार गंगाराम करवर,सदस्य निलेश देशमुख, प्रा.विद्याचंद्र सातपुते आदींसह सरपंच गोरक्ष पाडेकर, उपसरपंच डॉ.सतीश चासकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक पथवे,ग्रा.पं. सदस्य सौ.भारती चासकर, सौ.शांताबाई वावळे, सौ.दीक्षा पथवे,शालेय समिती सदस्य बालचंद चासकर, विक्रम वावळे, संतोष वावळे, माणिक चासकर, राधकीसन म्हस्के,सुनील चासकर, नामदेव आरोटे आदींसह मुख्याध्यापक श्री. सखाहरी दाते ,अनिल मोहिते, प्रमोद पवार,अरुण सूर्यवंशी, नितीन कोते हे शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 6 विद्यार्थ्यांचा व त्यांचे पालक यांचा व मार्गदर्शक शिक्षक श्री.सखाहरी दाते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच शालेय कामासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळचंद चासकर सौ.भारती चासकर, नामदेव आरोटे,डॉ.सतीश चासकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,रोटरी क्लब अकोले यांनी नेहमीच बहिरवाडी गावासाठी मोठे योगदान दिले आहे,वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, स्वच्छता मोहीम अंतर्गत डस्ट बिन चे वाटप वगैरे उपक्रम राबविले असून आता अंगणवाडी ते 7 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शिक्षकाशिवाय शिक्षण घेता यावे,तसेच डिजिटल स्कुल ला प्रेरणा मिळावी यादृष्टीने शैक्षणिक टॅब चे वाटप करून मोठे योगदान दिले आहे.याचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व बौद्धिक विकास होण्यासाठी होईल. तसेच शाळेच्या विकासासाठी सर्वानी असेच योगदान द्यावे असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष डॉ.रविंद्र डावरे, माजी सेक्रेटरी डॉ.सुरींदर वावळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या रोटरी क्लब च्या कार्याची,राबविण्यात आलेल्या व येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.तसेच शैक्षणिक टॅबची माहिती दिली.यावेळी प्रा. विद्याचंद्र सातपुते यांनी या टॅब च्या माध्यमातून आपला बौद्धिक क्षमता वाढवावी व जीवनात यशस्वी व्हावे,मोठ्या पदावर जावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी अक्षदा व स्मिता भोर या विद्यार्थ्यांनीनी या शैक्षणिक टॅब चा डेमो करून दाखविला व आपणास ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपणास करता येतो.यामध्ये सर्व विषयांचा समावेश असल्याचे सांगून आम्हाला अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले. व रोटरी क्लब चे आभार मानले.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक दीपक पथवे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. प्रमोद पवार यांनी केले व शेवटी आभार शिक्षक अनिल मोहिते यांनी मानले.
“”””””