डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठाण व रोटरी क्लब अकोले च्या वतीने स्वच्छता अभियान

अकोले प्रतिनिधी–
महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त महास्वच्छता अभियान रविवार २ मार्च रोजी अकोले शहरासह श्री अगस्ति आश्रम येथे राबवले गेले.
त्या अभियानांतर्गत रविवार दि.२ मार्च रोजी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री बैठक अकोले व रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले शहर व श्री अगस्ती ऋषी मंदिर परिसर येथे प्रतिष्ठाण चे व रोटरी क्लब चे असे एकूण 97 सदस्य यांनी स्वच्छता केली व स्वच्छतेबाबत जनजागृती केली. श्री बैठक निरूपणाद्वारे अध्यात्मिक जनजागृती गेली ८१ वर्षापासून सुरू आहे त्याचबरोबर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर ,जलपुनर्भरण, साक्षरता अभियान असे सामाजिक उपक्रम भारतात व परदेशातही राबवले जाते आहे

दि.26 रोजी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा संपन्न झाली.दोन दिवस चाललेल्या या यात्रेत जवळपास 3 लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती तर जवळपास 400 वर विविध खेळणीचे दुकाने ,हॉटेल, मनोरंजनाची दुकाने लागली होती ,त्यामुळे हा सर्व परिसर अतिशय घाण झाला होता.त्यामुळे या परिसराची स्वच्छता होणे अत्यंत आवश्यक होती.हे लक्षात घेऊन हा स्वच्छता अभियान उपक्रम
सकाळी 8.30 वाजल्यापासून 12.30 वा घेण्यात आला.हा परिसर सुंदररित्या स्वच्छ केल्याने दोन्ही ग्रुपचे कौतुक विविध स्तरातून होत आहे.

यावेळी धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे अकोले ,राहता,खंडाळा लोणी येथील सदस्य तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, निलेश देशमुख, भारत पिंगळे,जेष्ठ विधिज्ञ बी.जी. वैद्य, डॉ.प्रकाश वाकचौरे, अमोल वैद्य आदीसह अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते व प्रतिष्ठाण चे डॉ. गणेश नवले यांनी पुढील वर्षीही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले

तर ही घाण टाकण्यासाठी ठिकठिकाणी डष्टबिन ठेवण्यात येणार असल्याचे सांगत दुकानदारांनी यात्रा संपल्यावर आपल्या दुकानाजवळची जागा स्वच्छ करून गेल्यास घाणीचे साम्राज्य होणार नाही असे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी मत व्यक्त केले. तर अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ के. डी.धुमाळ,विश्वस्त व व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक यांनी ही स्वच्छता मोहीम राबवुन सर्व परिसर स्वच्छ व सुंदर केल्याबद्दल प्रतिष्ठानचे व रोटरी क्लब चे आभार मानले.
